SpreadIt News | Digital Newspaper

देशव्यापी लॉकडाऊन बाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हे महत्वाचे वक्तव्य!

देशभरात कोरोना रुग्णसंख्या दोन लाखाचा टप्पा रोज ओलांडते आहे. लसीकरण वेगाने होत असताना सुद्धा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर संसर्ग असल्याने प्रत्येकाच्या मनात भीती आहे. महाराष्ट्रासह अकरा राज्यांमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत.

महाराष्ट्रात 30 एप्रिल पर्यंत संचारबंदीचे नियम लागू आहेत. त्याचबरोबर याला मिनी लॉकडाउन देखील संबोधले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्राकडून देखील देशपातळीवर होणाऱ्या कोरोना संसर्गाचा आढावा रोज घेतला जात आहे. एका मागे एक बैठकांना देखील जोर आला आहे. अशातच सामान्य माणसाला देशभरातील लॉकडाऊन होतो की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement

देशभरात मजुरी करणारे लोक आपापल्या गावाला रवाना होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरांमध्ये काम करत असलेले परंतु गावापासून दूर असलेले लोक लॉकडाऊन मध्ये स्वतःचा व्यवसाय बंद झाला तर, जगायचे कसे? हा प्रश्‍न घेऊन आता गावाकडे परतत आहेत.

सर्व रेल्वे स्टेशन वर देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. अशातून कोरोना चा प्रादुर्भाव रोखला जाणार की अजून वाढणार? हा प्रश्न ऐरणीवर आहे.

Advertisement

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या योजनांसंदर्भात फेडरेशन ऑफ इंडियन स्मॉल मीडियम एंटरप्राइजेज (फिस्मे) च्या अध्यक्षपदी असणाऱ्या, अनिमेश सक्सेना यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी चर्चा केली.

या चर्चेमध्ये त्यांनी देशव्यापी लॉकडाऊन होणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. संपूर्ण देशात सरसकट लॉकडाऊन लावला तर आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे असा निर्णय होणार नसून मजुर, कामगारांनी देखील घराकडे सुरू असणारी वाटचाल थांबवावी, असे ही त्यांनी यातून सुचवले.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघेही कोरोना परिस्थितीचा रोज आढावा घेत आहेत. देशासाठी योग्य तो निर्णय घेतील मात्र सुविधा वाढविणे हा उद्देश असून, ऑक्सिजन, बेड कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. लहान लहान कंटेन्मेंट झोन केले जातील असेही त्या बोलल्या.

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या राज्यात अधिक निर्बंधांची गरज आहे मात्र, सरसकट लॉकडाऊन हा पर्याय नाही असेही त्या म्हणाल्या.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement