SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘तान्हाजी’ चित्रपट आता मराठीत पाहता येणार, स्टार प्रवाह वाहिनीवर ‘या’ तारखेला होणार प्रक्षेपण..

लोकांचे नेहमीच मनोरंजन करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी काही ना काही घेऊन येत असते. आता यावेळेस स्टार प्रवाह वाहिनी खास धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहे. स्टार प्रवाह वाहिनी ही अनेक नवनवीन प्रयोग करून आपल्या प्रेक्षकांना नेहमी उत्साहित ठेवत असते.

कॉमेडी असो वा ॲक्शन अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केलेल्या अभिनेता अजय देवगण यांची निर्मिती असलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट पहिल्यांदाच मराठीतून पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

Advertisement

तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमातून दाखवण्यात आली आहे. हा जबरदस्त चित्रपट आपल्या मातृभाषेत पाहायला मिळणं पर्वणीच असणार आहे. ‘मराठी परंपरा, मराठी प्रवाह’ हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या आणि नंबर वन हे बिरुद कायम राखणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर 23 एप्रिलला दुपारी 12 वाजता हा सिनेमा मराठीतून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

चित्रपटाविषयी काही खास :

Advertisement

अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, अजिंक्य देव, शरद केळकर, देवदत्त नागे आणि दिग्दर्शक ओम राऊत असे अनेक स्टार्स या सिनेमात आहेत.

कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, दमदार गाणी, अजय-अतुल यांचं काळजाला भिडणारं, डोळे दिपवणारे व्हीएफएक्स आपल्याला घरबसल्या पाहता येणार आहे.

Advertisement

वीर सुभेदार तानाजी मालुसरेंचा इतिहास :

तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणी मित्र होते, तसेच ते मराठा साम्राज्याचे वीर सुभेदार होते. स्वराज्य स्थापनेपासून प्रत्येक महत्त्वाच्या लढाईत, घडामोडीत त्यांचा सहभाग होता.

Advertisement

कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली होती. तेव्हा आपल्या मुलाचं लग्न अर्धवट सोडून त्यांनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी त्यांना आपल्या प्राणांची आहूती द्यावी लागली. शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला”, या शब्दांत तानाजीच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त केले होते.

स्टार प्रवाह वाहिनीवर 23 एप्रिलला दुपारी 12 वाजता हा सिनेमा मराठीत पाहता येणार आहे. स्टार प्रवाह कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आपल्या मायबोली मराठीमध्ये हा सिनेमा स्टार प्रवाहवर प्रक्षेपित करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. प्रेक्षकांसाठी ही अनोखी पर्वणी स्टार प्रवाह वाहिनीने आणली आहे.’

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement