हृदयद्रावक: ज्या ट्रकवर लाडक्या मुलीचं नाव, त्याच ट्रकखाली बापाने दोन मुलींना चिरडलं आणि स्वतःलाही संपवलं..
आपली मुलगी व्हॉट्सअॅपवर कोणत्यातरी मुलाशी चॅटिंग करत असल्याच्या संशयामुळे एका माथेफिरु बापाने आपल्या पोटच्याच मुलींना ठार केलं आहे.
त्यादिवशी काय घडलं?
मावळ तालुक्यातील इंदोरी गावात ही माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. या बापाने आपली मुलगी एका मुलाशी बोलते याचा राग धरत आपल्या पोटच्या दोन्ही मुलींना दया न दाखवता जागीच ठार केलं आहे.
स्वतःच्या मुलींना चालत्या ट्रकसमोर झोपवत या निर्दयी बापाने त्यांच्या अंगावरुन ट्रक घातला आहे. हा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यातील इंदोरी गावात घडलाय.
आपल्या दोन मुलींचा जीव घेत या बापाने स्वत:लासुद्धा संपवलं आहे. एकीकडे हळहळ व्यक्त होत आहे तर दुसरीकडे या मुलींच्या बापाविषयी संताप व्यक्त होत आहे. या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे मावळ तालुका तसेच पुणे जिल्हा सुन्न झाला आहे.
अंगावर ट्रक घातला आणि….
प्राप्त माहितीनुसार, त्या मुलींच्या बापाचे नाव भरत भराटे असे होते. त्यांची एक मुलगी कोणत्यातरी एका मुलासोबत व्हॉट्सअॅपवर चॅटिंग अर्थात मेसेजद्वारे गप्पागोष्टी करायची आणि हा प्रकार बापाला रुचला नाही. हा प्रकार समजल्यानंतर भरत भराटे यांना खूप राग आला.
ते इतके असंतुलित झाले झाले की, भराटे यांनी थेट नंदिनी भराटे आणि वैष्णवी भराटे या दोन्ही पोटच्या मुलींना ट्रकखाली झोपवले आणि त्या दोन्ही मुलींच्या अंगावरुन ट्रक घातला व त्या जागीच मृत्य पावल्या व त्याच क्षणी भरत फराटे यांनीसुद्धा चालू असलेल्या ट्रकखाली उडी घेत स्वत:चीही जीवनयात्रा संपवली.
सर्वत्र हळहळ व्यक्त
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हादरून गेला आहे. हा धक्कादायक प्रकार इंदोरी गावासह संपूर्ण मावळ तालुक्यात वाऱ्यासारखा संपूर्ण महाराष्ट्रात पसरला आहे. आपली मुलगी एका मुलाला फक्त व्हॉट्सअॅपवर बोलते. राग मनात धरून आपल्या मुलीला संपवल्यामुळे या निर्दयी बापाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs