SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्रातील ‘या गावात’ स्मशानभूमीत होते भजन-कीर्तन, काय आहे नेमकी भानगड? जाणून घ्या!

आयुष्याचा प्रवास संपल्यानंतर जी शेवटची विश्रांती मिळते ती जागा म्हणजे स्मशानभूमी! आपल्याकडे स्मशान भूमी या जागेला इतक्या सकारात्मक दृष्टीने पाहिले जात नाही. स्मशान भूमी ही पवित्र जागा मानली जाते. इथली कोणतीही गोष्ट घरी आणू नये किंवा तिकडे फार कोणी फिरकूही नये, असा समज आपल्या लहानपणीपासून निर्माण केलेला असतो.

मात्र, काही लोक या गोष्टीला अंधश्रद्धा मानून हा समज दूर करण्याचा एकविसाव्या शतकातही प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे कुठे नाहीतर महाराष्ट्रातच ही मोहीम काही लोकांनी हाती घेतली आहे.

Advertisement

महाराष्ट्रातील विदर्भातील अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी अचलपूर गाव आहे. या गावांमध्ये बोर्डी या ठिकाणी स्मशानभूमीतील फुले देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी लोक घरी आणतात.

एवढेच नाही तर, तिथे दीडशे प्रकारच्या विविध प्रजातींच्या फुलझाडांच्या लागवडीचे काम देखील लोकांनी हाती घेतले. आता दीडशे प्रकारच्या वेगवेगळ्या फुलांच्या प्रजाती या स्मशानभूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.

Advertisement

इथे बागेप्रमाणे मुलांना खेळायला जागा आणि बसायला बेंचेस देखील टाकलेले आहेत. देवाचे काम हे पवित्र ठिकाणी करावे असे बोलले जाते. मात्र, इथेच स्मशानभूमीत भजन-कीर्तनाचे कार्यक्रम देखील घेतले जातात.

आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणाचा परिणाम आपल्यावर होत असतो. वास्तूचे देखील तसेच असते. एखाद्या ठिकाणी प्रसन्न वातावरण निर्माण केले तर, आपसूकच आपल्यालाही प्रसन्न वाटते.

Advertisement

रमेश अंबाडेकर या सामाजिक कार्यकर्त्याने या दीड हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करून समाजामध्ये प्रबोधनाचा नवा पाठ निर्माण केला आहे.

त्या ठिकाणी वाढदिवस, सत्कार समारंभ, देहदान केलेल्या लोकांचे सत्कार, त्याचबरोबर बुद्ध वंदना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची वंदना असे कार्यक्रम देखील घेतले जातात.

Advertisement

या स्मशानभूमीचे खासियत देखील हीच आहे. इथे देखील सर्वार्थाने प्रयत्न करून प्रसन्न वातावरण निर्मिती केलेली आहे. त्यामुळे अंधश्रद्धेतून विज्ञानाकडे नेणारी ही वाट उद्या कधीतरी अंधश्रद्धा नष्ट होईल हा आशेचा किरण जरूर देऊन जाते.

➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement