SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा वाढ, पहा आजचा दर!

मुंबई – सोन्या-चांदीच्या भावात गेल्या काही दिवसापासून सतत चढ-उतार होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात होणारा परिणाम भारतात दिसून येतो..

मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. ऑगस्टमध्ये तर सोन्याच्या दराने अगदी उच्चांक गाठला. ऑगस्ट-2020मध्ये सोने प्रति तोळा 56 हजार 200 रुपयांवर पोहचले होते.

Advertisement

त्यानंतर देशात सोनं अगदी 11 हजार 500 रुपयांनी घसरलं होतं. पण, मार्च महिन्यात देशात कोरोनाची दुसरी भयानक लाट आली. कोरोनाने देशात थैमान घातले आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमती वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.

फेब्रुवारी-मार्च दरम्यान सोन्याच्या किंमती प्रति तोळा 43 हजार 700 रुपयापर्यंत घसरल्या होत्या. परंतु, कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे, बाजारातील चढ-उतारामुळे सोन्याच्या भावात पुन्हा वाढ होत आहे. मुंबईत आज (रविवारी) सोन्याचा दर 48 हजार 840 रुपये प्रतितोळा इतका झाला होता.

Advertisement

गुरुवारी (ता. १५ एप्रिल) सोने 47 हजार 715 रुपये प्रतितोळा होते. त्यात साधारण 1500 रुपये प्रति तोळा वाढ झाली आहे.

कोरोनाचा धोका कमी होण्याऐवजी पुन्हा वाढत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा सोने खरेदीकडे वळले आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर पुन्हा वाढताना दिसत आहेत.

Advertisement

तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे भाव वाढण्यासाठी अनेक कारणे आहेत. पुढील काही दिवसही सोन्याचे दर असेच चढे राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, 2021मध्येही सोन्याची किंमत वाढणं अटळ आहे. यावर्षी सोन्याचा दर नवे रेकॉर्ड करील. यंदा सोनं प्रति तोळा 63 हजार रुपये पार होईल, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञानी वर्तवला आहे.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

 

Advertisement