SpreadIt News | Digital Newspaper

नव्या रंगात, नव्या ढंगात येणार तुमचा गॅस सिलिंडर, पहा फोटो!

0

लाल किंवा निळ्या रंगात घरी येणारे गॅस सिलिंडर आपण नेहमीच पाहतो.. गॅसने पूर्ण भरलेले लोखंडी सिलिंडर उचलणे म्हणजे एक दिव्यच असते. मात्र, घाबरू नका.. कारण आता लवकरच तुमच्या या गॅस सिलिंडरच्या रंगाढंगात बदल होणार आहे.

आता लोखंडी सिलिंडरचा चेहरामोहराच बदलणार आहे. एवढेच नव्हे, तर हे सिलिंडर आता पारदर्शक होणार आहेत. त्यामुळे आपणास सिलिंडरमधील गॅस संपला की नाही, तेसुद्धा लगेच समजणार आहे.

Advertisement

इंडियन ऑईलने या नव्या आकारातील, रंगातील गॅस सिलिंडरबाबत माहिती दिलीय. चला तर मग या सिलिंडरमध्ये काय खास असेल, हे सिलिंडर आताच्या सिलिंडरपेक्षा कसे वेगळे असतील, याची माहिती घेऊ या..

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, आता इंडेनकडून कंपोझिट एलपीजी सिलिंडर देऊ केले आहेत. हे सिलिंडर सध्या दिल्ली आणि हैदराबादमध्ये उपलब्ध आहेत.

Advertisement

या सिलिंडरसाठी तुम्ही जवळच्या विक्रेत्याशी संपर्क साधू शकता. हे सिलिंडर लोखंडी नाहीत. अतिशय ‘स्टायलिश’ आहेत. दिसण्यात आकर्षक आहेत. सिलिंडरमधील ‘ग्रिप हँडल’पेक्षा डिझाईन बरेच वेगळे आहे.

नव्या सिलिंडरमध्ये विशेष काय?
नव्या सिलिंडरची खास गोष्ट म्हणजे ते जुन्या सिलिंडरपेक्षा 50 टक्के कमी वजनाचे आहेत. त्याच वेळी त्यांचा वेगळा आकार लक्षवेधी आहे. शिवाय हे सिलींडर कमी वजनातही उपलब्ध आहेत. जेणेकरून आपण लहान सिलिंडरदेखील खरेदी करू शकता.

Advertisement


पारदर्शक आकारामुळे आपण बाहेरून सिलिंडर पाहूनही आतील गॅसचा अंदाज लावू शकता. सिलिंडरमध्ये किती एलपीजी गॅस शिल्लक आहे, यासाठी तुम्हाला सिलिंडर उचलण्याची गरज भासणार नाही. तसेच सिलिंडर खरेदी करताना तुम्हाला सिलिंडरमध्ये किती गॅस आहे, हेसुद्धा समजणार आहे.

सिलिंडर गंजण्याची भीती नाही!
नवीन सिलिंडर लोखंडी असणार नाहीत. त्यामुळे ते गंजण्याची भीती नाही. हे सिलिंडर्स अगदी 5 आणि 10 किलो वजनातही उपलब्ध असतील. घरात सिलिंडरचा जास्त वापर होत नसेल, तर आपण 10 किलोचे छोटे सिलिंडर खरेदी करू शकता, ते आपल्यासाठी उपयुक्त ठरतील. शिवाय नव्या आकारातील, रंगातील सिलींडरमुळे स्वयंपाकघरातील सौंदर्य वाढणार आहे.

Advertisement

वापरासाठी पूर्ण सुरक्षित
सुरक्षेविषयी इंडियन ऑईलने सांगितले, की सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे. सिलिंडरला स्टायलिश बनवण्यासह सुरक्षेत कोणतीही तडजोड केलेली नाही. हे सिलींडर वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement