SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हवेतून पसरतोय कोरोना, ‘अशी’ घ्या काळजी!

कोरोनाने अवघ्या जगाला आपल्या कवेत घेतले आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. शक्तिशाली आहे.

कोरोनाचा असा प्रकोप सुरु असताना, ‘द लँसेट’ या वैद्यकीय नियतकालिकात एक लेख प्रकाशित झाला असून, त्यात कोरोनाचा विषाणू हवेतून फैलावत असल्याचे सांगण्यात आलेय. त्यामुळे जगभर खळबळ उडाली असून, अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झालेय.

Advertisement

दरम्यान, मॅरिलँड स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. फहीम युनूस यांनी मात्र चिंता करण्याची वा अनावश्यक भीती बाळगण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.

डॉ. फहीम म्हणतात, “लाळेतील तुषारकण हवेत असल्यामुळे त्याद्वारे कोविडचा विषाणू फैलावतो. त्यापासून बचाव करण्यासाठी कापडी मास्कचा वापर पूर्णपणे बंद करावा. 2 – N95 किंवा KN95 मास्कच खरेदी करावेत. एक मास्क एकच दिवस वापरावा. वापरलेला मास्क पेपर बॅगेत भरावा आणि दुसऱ्या मास्कचा वापर करावा. दर २४ तासानंतर मास्क बदलून वापरावा..”

Advertisement

हवेतून कोरोना विषाणूचा संसर्ग होतो, म्हणजे हवा संसर्गबाधित आहे, असा अर्थ होत नाही. हवेत विषाणू असू शकतात, इमारतींमध्ये आणखी धोका निर्माण होऊ शकतो, असे डॉ. फहीम यांनी म्हटले आहे.


कोरोना महासाथीच्या सुरुवातीपासून डॉ. फहीम हे ट्विटरच्या साहाय्याने लोकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले की, काही बाबींचे काटेकोर पालन केल्यास, घरी राहूनही या संसर्गावर मात करता येऊ शकते. घरातच योग्य पद्धतीने राहिल्यास ८० ते ९० टक्के रुग्ण कोरोनावर मात करू शकतात.

Advertisement

दररोज तापमान तपासणे, श्वासाचा वेग, हृदयाचे ठोके मोजणे आणि रक्तदाब मोजणे आवश्यक आहे. अनेक स्मार्टफोनमध्ये पल्स ऑग्जिमेंट्री अॅप असते. त्यात ऑग्ज ९० पेक्षा कमी असल्यास अथवा रक्तदाब ९० सिस्टोलिकपेक्षा खाली आल्यास, डॉक्टरांशी संपर्क साधावा. उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेहाचा त्रास असलेल्या ६०-६५ वर्षांच्या व्यक्तिंना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे ते म्हणाले.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा. 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement