SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

…म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी खासदार उदयनराजे यांना केली 450 रुपयांची मनी ऑर्डर!

राज्य शासनाने शनिवार-रविवार लॉकडाउन लावत कोरोना साखळी तोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक पाऊल उचलले होते. विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील तीव्र संताप व्यक्त करत, या निर्णयाला विरोध केला होता.

खासदार उदयनराजे यांचे विरोध करण्याचे तंत्र जरा हटके होते. त्यांनी साताऱ्याच्या पोवईनाका येथे भीक मांगो आंदोलन करत हातात चक्क कटोरी घेतली होती. खुद्द खासदार उदयनराजे यांच्या हातात कटोरा का? अशा आशयाच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या.

Advertisement

याद्वारेच उदयनराजे आपल्या लोकांच्या मागणीसाठी रस्त्यावर देखील उतरू शकतात आणि लोकांच्या गरजेसाठी असे देखील आंदोलन करू शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

या आंदोलनाद्वारे त्यांच्याकडे 450 रुपये जमले हे पैसे त्यांनी तहसीलदारांकडे सुपूर्त केले. त्यांनी ते स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली केले. मात्र, ही रक्कम जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी न स्वीकारता उदयनराजे यांनाच मनीऑर्डर करत एक ओळीचे पत्र देखील लिहिले.

Advertisement

या पत्रामध्ये त्यांनी ‘सरकारी नियमानुसार मी या निधीचा स्वीकार करू शकत नाही’ असे लिहित त्यांच्या राहत्या पत्त्यावर मनीऑर्डर केली. आता उदयनराजे या पैशांचे काय करतात आणि ही मनीऑर्डर आणि हे पत्र कोणत्या प्रकारे स्वीकारतात हे पाहण्यासारखे असणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement