SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पुन्हा रंगणार भारत-पाक क्रिकेटचा थरार, पाक संघाला भारतात येण्यास केंद्राचा हिरवा कंदील!

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे दोन्ही देशातील क्रिकेट रसिकांसाठी एक रसरशीत मेजवानी.. एक वेळ फायनल नाही जिंकली, तरी चालेल, पण पाकिस्तानला हरवा, अशीच भावना भारतीय क्रिकेट रसिकांची असते. त्यातूनच या खेळातील रंगत वाढत जाते..

मात्र, दोन्ही देशातील संबंध कायमच ताणलेले असतात. त्यातून भारताने पाकसोबत क्रिकेट खेळणेच बंद केले आणि दोन्ही देशातील खेळाडूंसह क्रिकेट रसिक या रोमांचक अनुभवास मुकले..

Advertisement

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी-20 वर्ल्ड कप होतो आहे. आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने या स्पर्धेची तयारी सुरू केल्याची माहिती दिली.

स्पर्धेसाठी देशातील 9 शहरं तयार असल्याचे बीसीसाआयने सांगितले. स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबाद येथे होणार आहे. तसेच दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, धर्मशाळा, कोलकाता आणि लखनौची मैदानेही क्रिकेटच्या या महाकुंभमेळ्यासाठी सज्ज आहेत.

Advertisement

भारत-पाकमधील ताणलेले संबंध पाहता, पाक खेळाडूंना भारतात येण्याची परवानगी मिळणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष एहसान मनी यांनी बीसीसाआयने पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देण्याबाबत 31 मार्चपर्यंत आपले म्हणणे स्पष्ट करण्यास सांगितले होते.

त्यानंतर 1 एप्रिल रोजी झालेल्या आयसीसीच्या बोर्ड मीटिंगमध्येही आगामी एक महिन्यात हा वाद सोडवण्यात यावा, असा निर्णय झाला होता. अखेर T-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान संघाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.

Advertisement

मोदी सरकार पाकिस्तानी खेळाडू आणि प्रसार माध्यमांना व्हिसा देण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (ICC) सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शुक्रवारी (ता. १६ एप्रिल) झालेल्या व्हर्चुअल बैठकीत बीसीसीआयने याबाबत माहिती दिली.

बैठकीमध्ये सहभागी झालेल्या बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले, की टी-20 वर्ल्ड कप ही आयसीसीची स्पर्धा आहे. त्यामुळे सरकारने पाकिस्तान खेळाडू आणि प्रसार माध्यमांना भारतात येण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.

Advertisement

पाकिस्तानी चाहत्यांबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. आगामी काळात याबाबत चर्चा होऊन संबंधित मंत्रालय याबाबत निर्णय घेईल, असेही बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आता महिन्याभरातच हिंदुस्थानने याबाबत निर्णय घेत पाकिस्तान खेळाडूंना व्हिसा देण्यास सहमती दर्शवली आहे.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement