Take a fresh look at your lifestyle.

एका महिन्यात चार वेळा लग्न आणि तीन वेळा घटस्फोट; सुट्टीसाठी बँक कर्मचाऱ्याचे अजब कृत्य

0

नोकरी करताना आपल्याला वातावरण व्यवस्थित हवे असते. त्यानुसारच आपल्याला पगारही उत्तम लागतो. याच बरोबरीने आपल्याला हव्या तेव्हा सुट्ट्या देखील मिळाव्या अशी देखील कर्मचाऱ्यांची इच्छा असते.

यासाठी अनेकदा खोटी कारणे सांगून देखील बरेच जण सुट्ट्या मारतात. त्यासाठी आपण काही लोकांना आजारी पाडतो, तर काही लोक तर अक्षरशः आमच्या घरी कोणी गेले आहे, असे खोटे सांगून सुट्टी घेतात. हा सगळा मजेचा भाग असला तरी देखील, यातून गंभीर अशा प्रकारचे गुन्हे देखील घडू शकतात.

Advertisement

तायवान मध्ये घडलेल्या एका घटनेविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे वाचून तुम्ही देखील चक्रावून जाल. तायवान मधील एक व्यक्ती ताइपे येथे एका बँकेत काम करते. आपले लग्न आहे म्हणून या व्यक्तीने बँकेत सुट्ट्या मागितल्या. मात्र, त्याला केवळ 8 दिवसांची सुट्टी देण्यात आली.

6 एप्रिल 2020 रोजी या व्यक्तीचा एका मुलीसोबत विवाह झाला. त्याला आठ दिवसांची सुट्टी मिळाली. मात्र, त्यांनी या मुली सोबत आपले पटत नाही घटस्फोट हवा असे म्हणत सुट्ट्या वाढवून घेतल्या. घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा कारण दिले आणि पुन्हा त्याच मुलीशी लग्न केले.

Advertisement

कायदा आणि न्यायाचा हवाला देत या व्यक्तीने तब्बल चार वेळा लग्नासाठी सुट्टी घेतली आणि तीन वेळा आपला तलाक झाला आहे, असे सांगितले. या सगळ्या कथेवर जेव्हा बँकेला संशय यायला लागला तेव्हा, न्यायालयात धाव घेत बँकेने घडलेला प्रकार सांगितला.

ताइपे येथील सिटी लबर्ब्युरो येथे आरोपीने बँके विरोधात तक्रार केली. बँकेला 700 डॉलरचा दंड देखिला करण्यात आला. मात्र बँकेने जेव्हा न्यायालयात धाव घेतली. तेव्हा कामगार कायद्यांतर्गत जरी असे खोटे बोलून सुट्ट्या देणे येत नसले तरी देखील; त्या एकाच व्यक्तीशी एखादा व्यक्ती अनेक वेळा लग्न करू शकत नाही, आणि त्याच्या दिवस सुट्टी घेऊ शकत नाही, असे देखील लिहिलेले नसल्याने न्यायालयाने देखील बँकेलाच सुनावले.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

Leave a Reply