नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी तब्बल 10238 कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य; राज्य शासनाकडून मिळाली मान्यता
राज्यातील नाशिक ते पुणे या दुहेरी मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाकरता येणाऱ्या 11 वर्षांत 10,238 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे, तसा आदेश सरकारने काल (गुरुवारी) काढला आला.
खर्च किती येणार?
या मार्गाच्या उभारणीत केंद्र सरकार व राज्य शासनाची महारेल कंपनी यांची संयुक्त भागिदारी असेल. महत्वाचं म्हणजे 231 किलोमीटरचा हा मार्ग असेल.
या मार्गाच्या उभारणीसाठी तब्बल 16 हजार 39 कोटी रुपये इतका खर्च येणार असून, त्यातील 60 टक्के रक्कम ही कर्जाच्या रुपात उभारली जाणार असल्याची माहिती आहे.
प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित व व्यवहार्य ठरावा, त्यासाठी या प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होईपर्यंत 10,238 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचं कळतंय.
दरम्यान पहिल्या वर्षी 615 कोटी तर दरवर्षी 8 टक्के वाढ करून दुसऱ्या वर्षी 665 कोटी तसेच तिसऱ्या वर्षी 717 कोटी असे करत करत सातव्या वर्षी 977 कोटी आणि अकराव्या वर्षी 1,328 कोटी इतका निधी राज्य शासन स्वत:च्या आर्थिक स्रोतांमधून देणार आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलं आहे.
पुणे – नाशिक रेल्वेमार्गाबाबत काही महत्वाचं..
▪️ या मार्गावर 24 रेल्वेस्थानके, 18 बोगदे असणार
▪️ तीन जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार- पुणे, अहमदनगर, नाशिक
▪️ या औद्योगिक केंद्रांना जोडणारी रेल्वे – आळंदी, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, सिन्नर, सातपूर
▪️ या रेल्वे मार्गावरील गाड्यांचा महत्तम वेग असेल – ताशी 200 किलोमीटर तर सरासरी वेग 140 किमी प्रतितास राहणार
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs