SpreadIt News | Digital Newspaper

लॉकडाऊनबद्दल मनात शंका, नेमकं कोणत्या गोष्टी चालू किंवा बंद, वाचा तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी संचारबंदीची घोषणा केली आहे. ही संचारबंदी 15 दिवसांसाठी असून व बुधवारी 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून लागू झाली आहे. राज्यात काय बंद व काय सुरु राहणार हे अद्यापही नागरिकांना स्पष्ट होत नाही, यासाठीच सरकारने जनतेच्या मनातील प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

▪️ घरकाम करणारे, वाहनचालक, स्वयंपाकी कामावर जाण्यास परवानगी आहे का? रेल्वे, बसेसने प्रवास करू शकतात का?
– याबाबतीत स्थानिक प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यायचा आहे.

Advertisement

▪️ मूव्हर्स एन्ड पॅकर्स च्या मदतीने घरसामान हलवू शकतात का ?
– नाही; परंतू अतिशय अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक प्रशासन याला परवानगी देईल.

▪️ महाराष्ट्रांतर्गत खासगी वाहनाने प्रवास शक्य आहे का ?
– कोणत्याही योग्य व आवश्यक कारणास्तव प्रवास करू नये. तुम्ही सार्वजनिक वाहनाचा उपयोग करून एका ठिकाणाहून/ स्थानकाहून दुसरीकडे जाऊ शकता.

Advertisement

▪️ वाईन शॉप्स आणि सिगारेट दुकाने उघडी राहतील का ?
– नाही.

▪️ सकाळी बाहेर फिरायला जाणे, धावणे, सायकलिंगसाठी परवानगी आहे का?
– नाही.

Advertisement

▪️ रस्त्यावरील खाद्यविक्रेते सुरु ठेवू शकतील?
– सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत पार्सल आणि घरगुती वितरणास मान्यता देण्यात आली आहे. (या प्रकारात होम डिलिव्हरी फारशी होत नाही)

▪️ कुरियर सेवा सुरु राहील का ?
– फक्त आवश्यक कारणांसाठी कुरियर सेवा सुरु राहील.

Advertisement

▪️ पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा पेट्रोल पंप्स, एव्हिएशन स्टेशन्स, एलपीजी बॉटलिंग प्लांट हे आवश्यक सेवेत येतात का ?
– हो.

▪️ वस्त्रोद्योग आणि कपडे उद्योग सुरु ठेवता येईल ?
– नाही

Advertisement

▪️ आवश्यक ई-कॉमर्स म्हणजे नेमके काय ?
– सर्व प्रकारच्या वस्तू व सेवा ज्या आवश्यक गटात येतात उदा. किराणा , औषधी, अन्न पदार्थ इत्यादी इ कॉमर्स मार्फत वितरित केले जाऊ शकतात.

▪️ प्लम्बर, सुतार, वातानुकूलन, फ्रिज तंत्रज्ञ, पेस्ट कंट्रोल व इतर घरगुती सामानाची दुरुस्ती करणारे येऊ शकतात का ?
– अगदी टाळण्यासारखे नसेल तर पाणी आणि वीज, पेस्ट कंट्रोल, घर स्वच्छता, उपकरण दुरुस्ती खूप आवश्यक असले पाहिजे तरच याबाबतीत सेवा देणाऱ्या व्यक्ती ये-जा करू शकतात.

Advertisement

▪️ दाताचे दवाखाने सुरु राहतील का ?
– होय

▪️ स्टेशनरी, पुस्तकांची दुकाने उघडे असतील का ?
– नाही

Advertisement

▪️ औषधी उत्पादनांची यंत्रसामुग्री, उपकरणे यांच्या उद्योगांना परवानगी आहे का ?
-होय

▪️ आवश्यक सेवा फक्त सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीतच सुरु राहील का?
– स्थानिक प्रशासनाने या गटातील सेवांना काही इतर कायद्यान्वये वेळा ठरवून दिली असेल तर त्या वेळेत त्यांना सुरु ठेवता येईल; मात्र आपत्ती व्यवस्थापन कायद्यात यासंदर्भात काही निर्बध नाहीत.

Advertisement

▪️ सर्वसामान्य नागरिक लोकल प्रवास करू शकतील का?
– होय, आदेशात दिलेल्या वैध कारणांसाठी सर्वसामान्य नागरिक लोकल रेल्वेचा उपयोग करू शकतील.

▪️ खासगी वाहने कर्मचाऱ्यांना घेऊन कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्याची परवानगी आहे का?
– त्यांची कार्यालये किंवा आस्थापना आवश्यक गटात असतील किंवा त्यांना निर्बंधातून वगळले असेल तेच प्रवास करू शकतील.

Advertisement

▪️ सिमेंट, रेडी मिक्स, स्टील हे बांधकाम साहित्य खुलेपणाने मिळू शकेल का ?
– संबंधित बांधकाम स्थळ सुरु ठेवण्यास परवानगी असेल, बांधकाम साहित्याची ने-आण करता येईल, साहित्यांची ऑर्डर ऑनलाईन किंवा दूरध्वनीवरून देता येईल; मात्र कुठलेही बांधकाम साहित्याचे दुकान उघडे ठेवता येणार नाही.

▪️ प्राणी तसेच लोकांसाठी मदतीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे काय ?
– स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेशिवाय त्यांना काम सुरु ठेवता येणार नाही.

Advertisement

▪️ ट्रॅव्हल कंपन्या व सेवा सुरु राहतील का ? ट्रॅव्हल, पासपोर्ट, व्हिसा सेवांचे काय ?
– ट्रॅव्हल एजन्सी दुकान सुरु ठेवून काम करू शकणार नाहीत. मात्र इंटरनेट/ ऑनलाईन काम करू शकतात. एक खिडकी योजनेतील सर्व सुविधा जसे कि व्हिसा, पासपोर्ट सेवा, सर्व शासकीय सेतू केंद्रे, हे शासनाचा एक भाग म्हणून परवानगी दिली आहे.

▪️ आवश्यक सेवा-सुविधांना सुरु ठेवण्यासाठी साहाय्यभूत उद्योग सुरु राहू शकतील का ?
-‘essential for essential is essential’ म्हणजेच आवश्यकसाठी आवश्यक ते आवश्यक हे तत्व आहे. तरी देखील काही संभ्रम असल्यास उद्योग विभागाचा निर्णय अंतिम राहील.

Advertisement

▪️ कामाच्या ठिकाणाजवळ राहणारे कामगार उद्योग-कंपनीत येऊ शकतात की, इतर भागातून व गावांतून कामाच्या ठिकाणी येणाऱ्यांना सुद्धा परवानगी आहे ?
-13 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशात आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना परवानगी आहे. त्यामुळे तेथील कामगार व कर्मचारी ये जा करू शकतात. इतर कारखाने व उद्योगांच्या बाबतीत ज्या कामाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररित्या कामगारांची राहण्याची व्यवस्था केलेली असेल आणि तिथून त्यांच्या प्रवासाची स्वतंत्र व्यवस्था असेल ते उद्योग सुरु राहू शकतात.

▪️ आयातदार व निर्यातदार यांना परवानगी दिली आहे. मात्र या निर्यातदारांना कामासाठी साहाय्यभूत ठरणाऱ्या वस्तू किंवा सेवा देणारे सुरु ठेवू शकतील का ?
– नाही. केवळ आवश्यक वस्तूंची आयात करणे अपेक्षित आहे. इतर आयात वस्तूंचा साठा करून ठेवावा लागेल. निर्यातीच्या बाबतीत अगोदरच तयार करून ठेवलेल्या वस्तूंची निर्यात करता येईल.

Advertisement

▪️ उत्पादन करणाऱ्या उद्योगांना परत परवानग्या घ्याव्या लागतील कि पूर्वीच्या परवानगी वैध असतील?
– उद्योगांना सुरु राहण्यासाठी 13 एप्रिल 2021 च्या आदेशाप्रमाणे पूर्तता करणे गरजेचे आहे.

▪️ आवश्यक वस्तूंचा पुरवठा दुकानांना करण्यासाठी त्या व्यक्तीस रॅपिड अँटीजेन चाचणी करावी लागेल का?
– नाही

Advertisement

▪️ आवश्यक वस्तू जसे की अन्न पदार्थ हे उपाहारगृहामार्फत किंवा ई कॉमर्समार्फत रात्री 8 नंतर घरपोच वितरित करता येईल का?
– 13 एप्रिलच्या आदेशान्वये आवश्यक सेवा आणि सुविधांवर तसेच घरगुती पुरवठा करण्यावर बंदी नाही. या सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांच्या कामांना स्थानिक प्रशासनाने रात्री 8 नंतर काम करण्यास परवानगी दिली असेल तर घरी पुरवठा (होम डिलिव्हरी) रात्री 8 नंतर करता येईल. स्थानिक प्रशासन वेळेमध्ये आवश्यकता भासल्यास लवचिकता ठेऊ शकते.

▪️ खूप मोठ्या गृहनिर्माण संस्थेत संपूर्ण सोसायटी मायक्रो कंटेनमेंट जाहीर केली जाऊ शकते का?
– सोसायटीच्या परिसरात 5 पेक्षा जास्त व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळल्यास ते क्षेत्र मायक्रो कंटेनमेंट घोषित करावे लागेल. जर गृहनिर्माण संस्था खूप मोठी असेल तर स्थानिक प्रशासन याबाबतीत रुग्णांचे काही प्रमाणात विलगीकरण क्षेत्र करण्याबाबतीत नियोजन करू शकेल.

Advertisement

▪️ स्थानिक प्रशासन दुसऱ्या कोणत्या मुद्द्यांवर नव्याने आदेश निर्गमित करू शकतील ?
– स्थानिक प्रशासन अपवादात्मक म्हणून काही सेवांना आवश्यक म्हणून परवानगी देऊ शकतील. गरज वाटली तर संसर्ग झपाट्याने पसरविणारे काही स्थळे व ठिकाणे बंद करण्याचे अधिकार असतील. मात्र राज्य शासनाची मंजुरी घेणे आवश्यक असेल.

▪️ बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेने प्रवासास मुभा आहे काय?
– आवश्यक सेवा असल्याने त्या सुरूच राहतील आणि त्यातून आवश्यक असेल तर कुणीही प्रवास करू शकेल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement