फक्त 1 धाव देऊन 3 विकेट्स घेणारा ‘हा’ युवा गोलंदाज कोण? एकाच ओव्हरमध्ये मॅच टर्न आणि सामना आरसीबीच्या खिशात, वाचा सविस्तर…
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात काल झालेल्या आरसीबी विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात फक्त 1 षटकात 1 धाव देऊन आरसीबीच्या युवा गोलंदाजाने 3 विकेट्स घेतल्या आणि सेट फलंदाजांना आऊट करून सामना टर्न केला. संघाला सामना जिंकवून देण्यामध्ये त्याचा महत्वाचा वाटा पाहायला मिळाला. त्यामुळे हे एक षटक या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरले.
शाहबाजने सामना रोमांचक स्थितीत आणला….
ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये शेवटची काही षटके सामना पलटवणारी असतात. 16-20 पर्यंतची षटके ही म्हणूनच ‘डेथ ओव्हर्स’ म्हणून ओळखली जातात. त्यातल्या त्यात 17वे षटकावर फार काही अवलंबून असते.
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने 17वे षटक युवा गोलंदाज शाहबाझ अहमदला दिले आणि सामना त्याने जागीच फिरवला.
17वे षटक-
शाहबाजने 17व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जॉनी बेअरस्टोला यावेळी 12 धावांवर झेलबाद केले आणि महत्वाचा फलंदाज बाद झाल्याने हैदराबादला तिसरा धक्का मिळाला.
दुसऱ्या चेंडूवर शाहबाझने चांगल्यापैकी सेट झालेल्या भक्कम बाजू लावून धरणाऱ्या मनीष पांडेला आऊट केले आणि आरसीबीला मोठे यश मिळवून दिले. कारण खेळपट्टीवर मनीष हा एकच स्थिरस्थावर झालेला फलंदाज होता आणि तो सामना फिरवू शकत होता. मनीषला यावेळी 38 धावा करता आल्या.
सलग 2 चेंडूंवर शाहबाझने विकेट्स मिळवल्या होत्या. आता तिसऱ्या चेंडूवर शाहबाझ हॅट्रिक घेणार का, याची उत्सुकता होती, पण विजय शंकरने चेंडू बचावात्मकपणे खेळला आणि शाहबाझची हॅट्रिक हुकली. चौथ्या चेंडूवर शंकरने एक धाव काढली. ही या षटकातील एकमेव धाव ठरली.
अखेरच्या चेंडूवर शाहबाझने धडाकेबाज फलंदाज अब्दुल समदला झेलबाद केले. अब्दुल समदला यावेळी एकही रन काढता आला नाही. चांगली कामगिरी करत शाहबाझने 17व्या षटकात फक्त अवघा 1 रन देऊन 3 विकेट्स घेत सामन्यचं पारडं आरसीबीच्या बाजूने झुकवलं. शाहबाझ यावेळी आरसीबीसाठी मॅचविनर ठरला.
आरसीबीच्या 149 धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे हे दोघे सेट झाल्याने त्यांची चांगलीच पार्टनरशीप झाली. वॉर्नर आणि पांडे या जोडीने आरसीबीच्या गोलंदाजीवर तुटून पडले आणि दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. वॉर्नरने आपले अर्धशतक पूर्ण केले व 54 धावांवर बाद झाला आणि हळूहळू हैदराबादच्या हातून विजय निसटल्याचे समजून गेले आणि त्यांना 143 धावांपर्यंतच मजल मारता आली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs