एसबीआय कोरोना रक्षक पॉलिसीअंतर्गत तुम्हाला मिळणार 2.5 लाख रुपयांपर्यंतचा कव्हर, तुम्ही फक्त ‘एवढंच’ करायचं…
भारतात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढते आहे. रुग्णही वेगात वाढत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही कोरोनाग्रस्त झाला असाल तर उपचार करण्यासाठी खर्चही लाखात जातो. उपचारासाठीच्या खर्चाबाबत काळजीत असाल, तर तुम्हाला यातून सुटका मिळू शकते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्याकडे कोणतीही एक पॉलिसी असणं गरजेचं आहे. देशातील सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने कोरोनाच्या खर्चासाठी एक योजना आणली आहे, यात तुम्हाला फक्त 156.50 रुपयांत चांगला फायदा मिळू शकतो. बँकेच्या या योजनेचं नाव ‘कोरोना रक्षक पॉलिसी’ असं आहे.
SBI कोरोना रक्षक पॉलिसीबद्दल…
▪️ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची कोरोना रक्षक पॉलिसी एक आरोग्य विमा संरक्षण योजना आहे.
▪️ भारतीय स्टेट बँकेची ही कोरोना पॉलिसी घेण्याआधी तुम्हाला कोणतीही मेडिकल टेस्ट गरज लागत नाही.
▪️ कोरोना रक्षक पॉलिसीमध्ये तुम्हाला 100 टक्के कव्हर दिला जाणार,असल्याचं SBI कडून सांगण्यात आलं आहे.
▪️ कोरोना रक्षक पॉलिसी खरेदी करण्यासाठी फक्त वयाची अट आहे. ती म्हणजे तुमचं वय किमान 18 वर्ष असायला हवं.
▪️ कोरोना रक्षक पॉलिसीमध्ये तुम्ही कमीत कमी प्रीमियम 156.50 रुपये आणि अधिकाधिक 2230 रुपये इतका प्रीमियम भरू शकता.
▪️ या पॉलिसीमध्ये 105 दिवस, 195 दिवस आणि 285 दिवसांचा कालावधी आहे.
▪️ कव्हरच्या बाबतीत सांगायचं झालं, तर स्टेट बँकेच्या या पॉलिसीमध्ये कमीत कमी 50 हजार आणि जास्तीत जास्त 2 लाख 50 हजारांचा कव्हर मिळतो.
▪️ कोरोना रक्षक पॉलिसीबद्दल जर तुम्हाला अधिक माहीती हवी असेल तर तुम्ही 022-27599908 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन शंका विचारू शकता.
▪️तसंच https://www.sbilife.co.in/en/individual-life-insurance/online-plans या अधिकृत लिंकवरुनही अधिक माहिती घेता येईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs