SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दिवसभरातील अत्यंत महत्वाच्या घडामोडी

शेअर बाजार निर्देशांकांत अर्धा टक्‍क्‍यांपर्यंत वाढ
मुंबई – गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचा निर्देशांक कोसळल्यामुळे आता बऱ्याच कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी पातळीवर आहेत. त्याचबरोबर लॉकडाउनच्या काळामध्ये जी क्षेत्र वाढतात अशा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकांत अर्धा टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली.
मात्र लवचिक परिस्थितीमुळे शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा चालू आहेत. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 259 अंकांनी म्हणजे 0.53 टक्‍क्‍यांनी वाढून 48,803 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी गुरुवारी 76 अंकांनी वाढून 14,581 अंकांवर बंद झाला.

सोन्या-चांदीच्या दरात वाढ
नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढले आहेत. त्या प्रमाणात भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदली गेली. एचडीएफसी सिक्‍युरिटी संस्थेचे वरिष्ठ विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले, की जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे दिल्ली सराफात सोन्याचे दर 159 रुपयांनी वाढून 46,301 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 206 रुपयांनी वाढून 67,168 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,745 डॉलर, तर चांदीचे दर 25.52 डॉलर प्रती औंस झाले.

Advertisement

पुणे विद्यापीठ १५ दिवस बंद
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व शैक्षणिक विभाग 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना विद्यापीठानं दिल्या आहेत. विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय आजपासून (15 एप्रिल) लागू होणार आहे. या निर्णयाअंतर्गत विद्यापीठातील सर्व विभाग 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात कोणीही विद्यापीठात येऊ नये, असे आवाहन प्रशासनानं केलं आहे.

रेमडेसीवीर पुरविण्यास कंपन्यांचा नकार
मुंबई – राज्यात रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनला तुटवडा जाणवू लागला आहे. अशातच राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. 8.50 लाख रेमडेसीवीर खरेदी टेंडर पुढे ढकलले आहे. इंजेक्शनचा पुरवठा करण्यास कोणताही पुरवठादार तयार नाही. राज्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने इंजेक्शन खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. पण पुरवठादारांनी इंजेक्शन देण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारला 654 रुपये दराने रेमडेसीवीर इंजेक्शन हवे आहे. पण खुल्या बाजारात बाराशे रुपये किंमत असताना कंपनी सरकारला रेमडेसीवीर द्यायला इच्छुक नाहीत.

Advertisement

वैद्यकीय परीक्षाही लांबणीवर
मुंबई – दहावी-बारावी आणि एमपीएससी परीक्षांनंतर आता राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून, परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल,” असे देशमुख यांनी म्हटलं आहे.

पेट्रोल-डिझेलच्या भावात घट
नवी दिल्ली – सरकारी तेल कंपन्यांनी आज खूप दिवसांनी सामान्यांना दिलासा देत पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या. गेले पंधरा दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थीर ठेवल्यानंतर आज किंमती कमी करण्यात आल्या. गुरुवारी पेट्रोलचे दर 16 पैशांनी, तर डिझेलचे दर 14 पैशांनी कमी झाले. या कपातीनंतर मुंबईतील पेट्रोलचे दर 96.83 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 87.81 रुपये प्रति लीटर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमती कमी झाल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील किंमतीवर देखील झाला आहे.

Advertisement

आयडीबीआयच्या 40 खातेदारांना ऑनलाईन गंडा
डोंबिवली – डोंबिवली पूर्व परीसरातील आयडीबीआय बँकेच्या शाखेतील 40 खातेदारांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी खातेदारांनी दिलेल्या तक्रारीनूसार रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फडके रोडवर असलेल्या आयडीबीआय बँकेच्या खात्यातील अनेक खातेदारांचे पैसे गहाळ झाल्याची बातमी पसरताच गुरुवारी बँकेत गर्दी झाली होती. दोन दिवस बँक बंद असल्याने गुरुवारी खातेदारांनी बँकेत धाव घेतली होती. जवळपास 50 खातेदारांच्या खात्यातील पैसे गहाळ झालेत.

वय झाले, की मरावेच लागते..
भोपाळ – कोरोनाने मध्य प्रदेशातही थैमान घातले आहे. येथील कोरोना स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. एकीकडे रोजच्या रोज हजारो करोनाबाधित समोर येत असताना, दुसरीकडे शेकडोच्या संख्येने मृत्यूही होत आहेत. मात्र, या मृत्यूंवर शिवराज सरकारमधील मंत्री प्रेमसिंह पटेल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘लोकांचे वय झाले, की मरावेच लागते,’ असे पशुपालन मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी म्हटले आहे.

Advertisement

आयपीएल : दिल्लीची खराब सुरुवात
मुंबई – आयपीएलमध्ये आज दिल्ली विरुद्ध राजस्थान संघात सामना सुरु झाले. राजस्थान संघाने नाणेफेक जिकून दिल्ली संघाला फलंदाजी दिली. मात्र, राजस्थानच्या बॉलिंगसमोर दिल्लीची दाणादाण उडाली. अवघ्या ३७ धावात त्यांचे ४ गडी बाद झाले होते.

नीट पीजीची परीक्षा स्थगित
नवी दिल्ली – देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारने 18 एप्रिल रोजी आयोजित केलेली नीट पीजी (NEET-PG) ची परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गुरुवारी सायंकाळी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement