SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चिंताजनक! अहमदनगरमध्ये कोरोनाचा विस्फोट; गेल्या 24 तासातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येतील वाढ भयावह!

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अतिरिक्त रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसात झालेली रुग्णवाढ भयावह आहे.

अनावश्यक घराबाहेर फिरणाऱ्या निष्काळजी लोकांमुळे निष्पाप लोकांचा जीव धोक्यात येत आहे. कोरोना आपल्या देशात संक्रमणाची वीण घट्ट करत असताना, अहमदनगर जिल्ह्यातून मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Advertisement

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3097 रुग्ण आढळून आले असून शहरात ही संख्या 675 आहे. कोरोनाचा अक्षरशः विस्फोट झाला असून निष्काळजीपणे वावरणाऱ्या काही नागरिकांमुळे संपूर्ण जिल्हा काळजीत पडला आहे.

प्रशासन नियम आणि निर्बंध घालत असताना अशा प्रकारे झालेली रुग्णवाढ ही चिंताजनक आहे.

Advertisement

गेल्या चोवीस तासात तालुकानिहाय झालेली रुग्णवाढ

अहमदनगर-675
राहाता- 352
संगमनेर-267
श्रीरामपूर-165
नेवासे-134
नगर तालुका-169
पाथर्डी-195
अकोले-147
कोपरगाव-177
कर्जत-190
पारनेर-133
राहुरी-107
भिंगार शहर-46
शेवगाव-114
जामखेड-79
श्रीगोंदे-107
इतर जिल्ह्यातील- 27

Advertisement

रोजची वाढणारी रुग्णसंख्या ही आपल्याला येणाऱ्या काळात घ्यावयाची काळजी आणि पाळायची खबरदारी सुचवत आहे. सगळ्यांनी स्वतःची काळजी घेत आजूबाजूच्या लोकांना सुरक्षित ठेवणे हा एकमेव मार्ग आता शिल्लक आहे.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement