SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टीसीएस, इन्फोसिस, अदानी ग्रुपमध्ये नोकरीची संधी, पहा किती जागा भरणार?

कोरोना संकटामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली. लॉकडाउनच्या धास्तीने अनेकांचे रोजगार बुडाले. उद्योगधंदे ठप्प झाले. अनेक कंपन्यांना टाळे लागले. उत्पन्नाचे स्रोत आटले. परिणामी अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.

कोरोना संकटात तुमचीही नोकरी गेली असेल तर घाबरू नका. तुमच्यासाठी नोकऱ्यांचे भांडार उघडले गेले आहे. भारतातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस (Infosys) या आघाडीच्या आयटी कंपन्यांसह अदानी ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली जाणार आहे.

Advertisement

भारतातील टीसीएस आणि इन्फोसिस या दोन आघाडीच्या कंपन्यांनी लॉकडाऊनच्या काळातही मेगाभरतीचा निर्णय घेतला आहे. पैकी टीसीएसमध्ये तब्बल 40 हजार पदांसाठी भरती होणार आहे. गेल्या वर्षीही कंपनीने एवढ्याच लोकांच्या हाताला काम दिले होते.

गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत टीसीएसला मोठा नफा झाला. कंपनीला अनेक प्रोजेक्टस मिळाले. त्यामुळेच कंपनीने 40 हजार पदांची भरली करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएस बाजारपेठ आणि कॅम्पस इंटरव्ह्यू अशा प्रकारे भरती प्रक्रिया होणार आहे.

Advertisement

इन्फोसिसमध्ये 26 हजार पदांसाठी भरती
भारतात दुसर्‍या क्रमांकावर असणाऱ्या इन्फोसिस या आयटी कंपनीत कॅम्पसमधून २६ हजार फ्रेशर्सना नोकरी दिली जाणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा एट्रिशन रेट 15 टक्के होता (attrition/कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याचा दर). जुलै 2021पासून कंपनी सेकंड परफॉर्मेन्स रिव्ह्यूला सुरुवात करणार आहे.

मागणी वाढत असताना एट्रिशन रेटमध्ये वाढ झाल्यामुळे नव्याने पदभरती करण्यात येणार असल्याचे इन्फोसिसकडून सांगण्यात आले. 26 हजार पैकी भारतीय कॉलेजमधून 24 हजार तरुणांना नोकरी देण्यात येणार आहे. शिवाय परदेशातही काही कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. 2020-21मध्ये इन्फोसिसने कॅम्पस इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून 19 हजार जणांची भरती केली होती.

Advertisement

दरम्यान, इन्फोसिसने नुकताच मार्च तिमाहीचा निकाल जाहीर केला. मार्च तिमाहीत कंपनीला 5076 कोटींचा नफा झाला. गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत यंदा त्यात 17.10 टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी मार्च तिमाहीत कंपनीला 4321 कोटीचा नफा झाला होता. कंपनीची एकूण कमाई 1 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

अदानी ग्रुपदेखील देणार नोकऱ्या!
नोएडा प्राधिकरणाने नोयडा विभागातील अदानी एन्टरप्राईजेस आणि डिक्सन टेक्नॉलॉजीजसह 13 कंपन्यांना औद्योगिक जमीन दिली. त्यामुळे नोएडा विभागात 3,870 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे. ‘सेक्टर 80 मधील 39,146 चौरस मीटर जमीन प्रस्तावित डेटा सेंटरसाठी अदानी एंटरप्राईजेस देण्यात आली आहे.

Advertisement

कंपनी नोएडामध्ये 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल अशी अपेक्षा आहे, असे पत्रक प्राधिकरणाने जाहीर केले आहे. याठिकाणी अदानी एंटरप्रायजेस एक डेटा सेंटरची स्थापना करील. त्यामुळे या क्षेत्रात केवळ वाढ होणार नाही, तर रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असे पत्रकात म्हटले आहे.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement