भारतीय लोकांत सोनं हा फक्त धातू नाही, तर त्याला इतकी किंमत आहे ते एक भावनिक मूल्य म्हणून विविध नात्यांत जपले जाते. भारतात सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. भारतात लोक सणासुदीला, शुभमंगलप्रसंगी सोन्याचे दागिने खरेदी करण्यावर अधिक भर देतात.
भारतात सोन्याची मागणी प्रचंड असते. सोने आयातीत भारत एक आघाडीचा देश आहे. दरवर्षी देशात 700 ते 800 टन सोन्याची आयात होत असते.
जुन्या काळापासून काळी सोन्याची शुद्धता प्रमाणित करणारी कोणतीही अधिकृत, सरकारमान्य अशी यंत्रणा नव्हती, त्यामुळे सोन्याचांदीचा व्यापार करणारे व्यापारी अर्थात सराफ व्यावसायिक शुद्धतेबाबत जे सांगत असत तेच ग्राह्य धरले जात असे आणि किंबहुना गिऱ्हाईकांचं नुकसान व्हायचं.
सरकारनं काही वर्षांपूर्वी सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता मापन करणारी हॉलमार्किंग ही प्रमाणीकरण यंत्रणा आणली. सराफ व्यावसायिक ग्राहकांना विकत असलेल्या प्रत्येक दागिन्याचं हॉलमार्किंग केलेलं असावं, अशी सूचना सरकारने केली. यामुळे ग्राहकांना सोन्याच्या दागिन्याची शुद्धता प्रमाणित असल्याची खात्री मिळू लागली.
हॉलमार्क काय आहे?
हॉलमार्क एक संकेतचिन्ह आहे. खऱ्या हॉलमार्कवर BIS चं त्रिकोणी निशाण असतं आणि त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहीलेली असते. ज्या कॅरेटचे सोने घेतले आहे, तितकी त्याची शुद्धता प्रमाणित आहे का? हे स्पष्ट असेल. तेव्हा सराफ व्यावसायिकांसाठी हॉलमार्किंग हे ऐच्छिक होते.
हॉलमार्कच्या नगावर 5 चिन्हे असतात
▪️ बीआयएसचा लोगो
▪️ कॅरेटचा आकडा (उदाहरणार्थ: 22K वगैरे)
▪️ अॅसे (परीक्षण) करणार्या संस्थेचे चिन्ह
▪️ घडणावळीचे वर्ष
▪️ सोनार किंवा पेढीचा लोगो
नोव्हेंबर 2019 मध्ये सरकारनं सोन्याचे दागिने आणि कलाकृतींसाठी 15 जानेवारी 2021 पासून हॉलमार्किंग अनिवार्य केलं जाईल, असं जाहीर केलं आहे. मात्र कोरोना साथीमुळे ही मुदत एक जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली. सरकारनं सराफ व्यावसायिकांना हॉलमार्किंगची तयारी करण्यासाठी आणि भारतीय मानक ब्युरोमध्ये (BIS) नोंदणी करण्यासाठी दीड वर्षापेक्षा अधिक वेळ दिला आहे.
हॉलमार्क सक्तीचं झाल्यावर 1 जूननंतर देशभरातील दागिन्यांच्या बाजारपेठेत केवळ हॉलमार्क असलेले 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातील. यामुळं ग्राहकांची फसवणूक टळेल. त्यांना शुद्ध सोन्याचे दागिने मिळतील.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs