जगात व्हॉट्सॲप चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कंपनीकडून आपल्या युजर्ससाठी अनेक खास फिचर्सही दिले जात आहेत. मात्र, आता तुम्ही थोडाही बेजबाबदारपणा केला तर तुम्हाला याचं नुकसान दिवसांत बसू शकते.
तुमचं व्हॉट्सॲप हॅक झाल्यास तुम्हाला Two-Factor Authentication ही सेटिंग ही वाचवू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही आता आणखी सावध राहणं गरजेचे आहे.
सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट झाक डॉफमन यांच्यानुसार, हॅकर्स त्यांच्या डिवाइसमध्ये आपले व्हाट्सअप ओपन करू शकतात. जेव्हा आपण व्हॉट्सॲप इन्स्टॉल करता तेव्हा तुम्ही सिमकार्ड आणि नंबरच्या माध्यमातून तुम्हाला एसएमएस कोड प्राप्त होतो तेच काम हॅकरही करू शकतो.
तुम्हाला 6 अंकी कोडचा (ओटीपी) मेसेज येईल तेव्हा तुमच्या फोनवर व्हॉट्सॲप सुरु राहील. मात्र, जेव्हा सातत्याने हा कोड तुम्हाला मिळत असेल तर समजून जा की हॅकर्सची प्रोसेस सुरु झाली आहे.
हॅकर्स सातत्याने चुकीचा कोड टाकत असेल, तर 12 तासांसाठी व्हॉट्सॲप ते अकाऊंट लाॅक करते. त्यामुळे वापरकर्ता आणि हॅकर्स या दोघांनीही व्हाॅट्सअॅपचा वापर करत येत नाही.
जेव्हा व्हेरिफिकेशन कोडची मर्यादा संपेल त्यानंतरच्या 12 तासांत पुन्हा नवीन व्हेरिफिकेशन कोड जनरेट केला जाईल. तेव्हाही तुमचे व्हॉट्सॲप सुरुच राहील. याचदरम्यान तुम्ही तुमच्या फोनवरून WhatsApp डिऍक्टिवेट करून पुन्हा इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करू नका. याचा फायदा हॅकर्सला होऊ शकतो.
हॅकर्स [email protected] वर एक ई-मेल तयार करून पाठवेल आणि व्हॉट्सॲप ज्या फोनमध्ये इन्स्टॉल होतं तो फोन हरवला किंवा चोरीला गेल्याचे सांगेल. सोबतच हा नंबर डिएक्टिव्हेट करण्याची विनंती करतात. त्यामध्ये फोन चोरी झाल्याचे खोटं कारण देण्यात येतं आणि तुमचं व्हॉट्सॲप हाताळलं जाऊ शकतं.
फोर्ब्जनं अंस सांगितलं की, व्हाॅट्सअॅपकडे एक ई-मेल पाठविण्यात आला आहे. त्यात काही मोबाईल नंबर दिलेले आहेत. मात्र, यातून एखादा व्यक्ती हा हॅकर की, वापरकर्ता हे कळत नाही. तसेच वापरकर्त्यांच्या बाबतीत माहीती असण्यासाठी कंपनीकडून कोणताही फाॅलोअपही घेतला जात नाही.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 इतर महत्वाच्या बातम्या :
1️⃣ आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/mvuaJ44