SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोरोना लस घ्या आणि मुदत ठेवींवर अधिक व्याज मिळवा; सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आणली ‘ही’ खास योजना..

देशात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाअधिक लसीकरण करणे गरजेचे आहे. कोरोना लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आता एक नवीन योजना आणली आहे.

लोकांनी मोठय़ा प्रमाणात लसीकरणात सहभाग नोंदवावा यासाठी सरकार पातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू असताना आता बँकांनीदेखील त्यात हातभार लावण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

देशात लसीकरण वाढविण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने नवी योजना सुरू केली असून यामध्ये ज्या लोकांनी लस घेतली आहे त्यांना मुदत ठेवीवर (एफडी) जास्त व्याज दिलं जाणार आहे. लस न घेणाऱ्यांना या स्कीमचा फायदा घेता येणार नाही. बँकेने सोशल मीडिया पोस्टद्वारे या योजनेची माहिती दिली आहे.

व्याज किती मिळणार?

Advertisement

आता सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ही नवी योजना जाहीर केली असून यात कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना मुदत ठेवीवर 0.25 टक्के अधिकच्या व्याजदराचा लाभ मिळणार आहे.

तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेंअर्तगत सध्या सुरू असलेल्या व्याजदरापेक्षा 0.50 टक्के अधिकचा व्याजदराचा लाभ मिळणार आहे.

Advertisement

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया सध्या 7 दिवस ते 10 वर्षापर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 2.75 ते 5.1 टक्के पर्यंत व्याज देते.

काय आहे योजना?

Advertisement

‘इम्युन इंडिया डिपॉझिट योजना’ असं या योजनेला नाव दिलं आहे. देशभरात मोठय़ा प्रमाणात लसीकरण करण्याची गरज असून यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृतीदेखील करण्यात येत आहेत.

‘इम्युन इंडिया डिपॉझिट’ योजनेंतर्गत एकूण 1, 111 दिवसांसाठी ही ठेव ठेवता येणार आहे. फक्त लसीकरण केलेल्या नागरिकांनाच हा फायदा मिळणार आहे.

Advertisement

कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना मुदत ठेवीवर 0.25 टक्के अधिकचा व्याजदराचा फायदा मिळणार आहे. ही योजना मर्यादित काळासाठी असणार आहे. या योजनेंतर्गत कोरोना लस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के व्याज मिळणार आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना लसीकरणात भाग घ्यावा, तसेच लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आणली आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

➖➖➖➖➖➖➖➖

Advertisement

🎯 इतर महत्वाच्या बातम्या :

1️⃣ आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/mvuaJ44

Advertisement

2️⃣ कलम 144 – कलम 144 म्हणजे काय? कलम 144 अंतर्गत येणारे निर्बंध कोणते? जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/gvua7I4

3️⃣ कोरोना लस घ्या आणि मुदत ठेवींवर अधिक व्याज मिळवा; सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आणली ‘ही’ खास योजना.. 👉 https://cutt.ly/JvustsA

Advertisement

4️⃣ व्हॉट्सॲप वापरताय? मग तुमचं व्हॉट्सॲप अकाऊंट होऊ शकतं हॅक, कसं ते जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/FvusanT

Advertisement