असे म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. मात्र, तंत्रज्ञानाचा योग्यप्रकारे वापर नाही केला तर या गाठी चुकून दुसऱ्याशीच बांधल्या जाऊ शकतात. तुम्हाला हे वाक्य मजेशीर वाटेल. मात्र, असेच काहीसे होताहोता राहिले आहे. जाणून घेऊया हीच गोष्ट!
आपल्या आयुष्याचा आधुनिक तंत्रज्ञान खूप मदत पूर्ण सिद्ध होते. साध्या साध्या गोष्टींमधून अनेकदा तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण आयुष्य सहज जगण्याचा प्रयत्न करतो. एखादा पत्ता आपल्याला माहीत नसेल तर गुगल मॅप सारखे ॲप आपल्याला त्यासाठी मदत करते.
बरेच लोक रोज या ॲपचा वापर करताना देखील दिसतात असताना तंत्रज्ञानामुळे मोठी अडचण निर्माण होणे अशी घटना फार क्वचित घडते. मात्र, काही वेळा या गोष्टीचे तोटे मोठ्या प्रमाणात असू शकतात. इंडोनेशियामध्ये झालेली एक घटना याचे उदाहरण आहे. एक नवरदेव गुगल मॅपच्या चुकीमुळे दुसऱ्याच लग्नाच्या कार्यक्रमात पोहोचला आणि सगळा गोंधळ तिथे सुरू झाला.
इंडोनेशियाच्या एक गावांमध्ये दोन कार्यक्रम होते एक लग्न आणि एक साखरपुडा हे दोन्ही कार्यक्रम एकाच गावात असल्याने सगळा गोंधळ झाला कुटुंब मुलीच्या कुटुंबाकडे जेव्हा पोहोचले स्वागत समारंभ, नाश्ता, चहापाणी या गोष्टी झालेल्या कुटुंबातील सदस्य एकमेकांशी बातचीत करू लागले. तेव्हा नवरीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला ही बाब लक्षात आली.
नवरी त्यावेळी मेकअप रूममध्ये असल्यामुळे तिला देखील नेमके खाली कोणते पाहुणे आले आहेत याचा पत्ता नव्हता. लग्नाच्या कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचण्यासाठी नवरदेवाने गुगल मॅप ची मदत घेतली. या युवकाला इंडोनेशियातील मध्ये जावा च्या पाकिस जिल्ह्यातील लोसारी हेम्लेट इथे जायचे होते. मात्र, गुगलच्या मदतीने तो जेंगकोल हेम्लेट येथे पोहोचला.
साखरपुड्याच्या ठिकाणी ज्याचं लग्न आहे तो युवक पोहोचला आणि ज्या तरूणीचा साखरपुडा होणार होता तिने आपण इथे कोणाला ओळखत नसल्याचे सांगितले. मुलाच्या चुलत्याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर मुलाकडच्यांनी त्यांची माफी मागत मदत घेऊन योग्य ठिकाणी पोहोचले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सगळीकडे ही बाब मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 इतर महत्वाच्या बातम्या :
1️⃣ आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/mvuaJ44