रामानंद सागर निर्मित रामायण ही मालिका अत्युच्च स्तरावर लोकप्रिय झाली होती. या मालिकेच्या आजही मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. रामायण ही कथा भारतासाठी आणि भारतीय संस्कृतीसाठी अतिशय जवळचा विषय आहे.
प्रभू श्री राम आणि सीता मातेच्या आयुष्यावर आधारित रामायण त्याचबरोबर विष्णूच्या रामावतारातील विविध लीला या मालिकेद्वारे तुम्ही आधी अनुभवले असतील आणि आता पुन्हा एकदा लॉकडाऊन चे निमित्त साधून ही मालिका तुमच्या भेटीला येणार आहे. स्टार भारत चॅनल वर रोज संध्याकाळी 7 वाजता रामायण तुम्हाला पाहता येणार आहे.
अरुण गोविल, सुनील लहरी आणि दीपिका चिखलिया, दारा सिंग, या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. मागच्या लॉकडाऊन मध्ये देखील ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आली आणि तेव्हाही या मालिकेचा टीआरपी सर्वाधिक होता. आता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने कसा प्रतिसाद मिळतो, प्रेक्षकांना पुन्हा ही मालिका किती मोठ्या प्रमाणावर मनोरंजनाचा आस्वाद घेण्याची संधी देते हे पाहण्यासारखे असणार आहे.
रामायणामध्ये वर्णन केलेल्या प्रत्येक घटनेचा बालमनावर देखील संस्कार व्हावा म्हणून आजही कित्येक पिढ्या लोटल्यानंतर जेव्हा ही मालिका पुन्हा टीव्हीवर दाखवण्यात येते तेव्हा, तेवढ्याच उत्साहाने प्रत्येक घरात टीव्ही लावला जातो आणि ही मालिका पाहिली जाते हेच या मालिकेचे यश आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 इतर महत्वाच्या बातम्या :
1️⃣ आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/mvuaJ44