SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पहिल्या टप्प्यात आज दोन बँकांचे खासगीकरण!

नवी दिल्ली – बँकिंग सेक्टरसाठी आजचा (ता. १४ एप्रिल) दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. कारण, सरकारकडून पहिल्या टप्प्यातील दोन सार्वजनिक बँकांचं खाजगीकरण आज होण्याची शक्यता आहे.

काही मीडिया अहवालांच्या मते खासगीकरणाच्या प्रक्रियेला अंतिम स्वरुप देण्यासाठी आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक सेवा आणि आर्थिक प्रकरणांच्या विभागातील अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. तीत खासगीकरण होणाऱ्या संभाव्य बँकांबाबत चर्चा होणार आहे.

Advertisement

सूत्रांच्या माहितीनुसार, चार ते पाच सार्वजनिक बँकांचं खाजगीकरण करण्याची शिफारस नीती आयोगाने केली आहे. बैठकीत त्यावर चर्चा होणार असल्याचे समजते.

खासगीकरणाच्या यादीत या बँका
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, नीती आयोगाने 4-5 बँकांची शिफारस केली आहे. बैठकीत पैकी दोन बँकांचे नाव निश्चित केले जाईल. खासगीकरणाच्या यादीत बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra), इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank), बँक ऑफ इंडिया (Bank of India), सेंट्रल बँक (Central Bank) यांच्या नावाची चर्चा आहे.

Advertisement

आतापर्यंत याबाबत कोणताही निश्चित निर्णय झालेला नाही. मात्र, मंगळवारी (ता. 13) या बँकांच्या शेअरमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली होती. बीसइमधील माहितीनुसार अनेक डील्स अंतर्गत एक लाखापेक्षा अधिक शेअर्सना बदलल्यानंतर मंगळवारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्समध्ये 15.6 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.

यादीत कोणत्या बँका नसतील?
नीती आयोगाच्या मते, स्टेट बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त ज्या बँकांचे गेल्या काही दिवसांत विलिनीकरण झाले आहे, त्यांचे खासगीकरण होणार नाही. सध्या देशात 12 सरकारी बँका आहेत. खासगीकरणाच्या यादीत स्टेट बँकेव्यतिरिक्त पंजाब नॅशनल बँक, यूनियन बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा नसतील.

Advertisement

अर्थसंकल्पात झाली खासगीकरणाची घोषणा
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात बँकांच्या खासगीकरणाची घोषणा झाली होती. पुढील आर्थिक वर्षात दोन बँकांच्या खासगीकरणाची तयारी सुरू आहे. खासगीकरणाच्या यादीत बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक यांच्या नावांची चर्चा आहे. खासगीकरणासाठी अद्याप कोणत्याही बँकेला अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2021-22चा अर्थसंकल्प सादर करताना, सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका आणि एक विमा कंपनीचे खासगीकरण करणार असल्याचे प्रस्तावित केले होते.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

 

Advertisement