SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भाजपबरोबर लढण्यासाठी काँग्रेसचे यू-ट्यूब चॅनेल

नवी दिल्ली – भाजप म्हणजे शिस्तबद्ध संघटन. प्रत्येक गोष्टीचे अगदी व्यवस्थित प्लॅनींग. टेक्नोसॅव्ही पक्ष नि कार्यकर्तेही. निवडणूक असो व नसो, पक्षाचा, त्यांच्या सरकारचा कार्यक्रम लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहचविण्यात येतो.

आधुनिक काळानुसार होणारे बदल या पक्षाने, त्यांच्या कार्यकर्त्यांनी लगेच स्वीकारले. त्यामुळे इतर पक्षांपेक्षा भाजप नेहमीच दोन पावले पुढे राहिला आहे. अनेक मीडिया सेन्टर या पक्षाच्या ताब्यात असल्याचा आरोप होतो. शिवाय सोशल मीडियावरही भाजप कार्यकर्ते आपल्या पक्षाची बाजू मांडताना दिसतात.

Advertisement

भाजपला टक्कर देण्यासाठी आता काँग्रेसही सरसावली आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून काँग्रेसने ‘आयएनसी टीव्ही’ नावाने नवीन यु-ट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. या चॅनेलद्वारे लोकांना सत्य सांगण्यात येणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत हे चॅनल सुरू करण्यात आलं. या चॅनेलद्वारे लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवली जाणार आहे. तसेच देशातील विविध समस्यांवर या चॅनेलद्वारे फोकस टाकण्यात येणार आहे, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं.

Advertisement

यु-ट्यूब, फेसबुक आणि ट्विटरसह इतर सोशल मीडियावरही हे चॅनेल उपलब्ध असेल. या चॅनेलद्वारे काँग्रेसची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारची पोलखोल करण्यात येणार असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

उदघाटनाला दाखवला माहितीपट
चॅनेल लॉन्च केल्यानंतर त्यावरून पहिल्यांदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एक डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली. काँग्रेसच्या सर्व राज्यातील ट्विटर हँडलवरून ही डॉक्युमेंट्री रिट्विट करण्यात आली.

Advertisement


लोकांचा आवाज म्हणून ओळखले जाईल- सतेज पाटील
काँग्रेस नेते आणि राज्यातील मंत्री सतेज पाटील यांनी ट्विट करून या चॅनेलबाबत माहिती दिली. ‘खोटं बोल, पण रेटून बोल’च्या आजच्या जमान्यात सत्य सांगण्यासाठी स्वतःचाच प्लँटफॉर्म हवा. आयएनसी टीव्हीद्वारे देशातल्या जनतेला सत्य समजून घ्यायला नक्की मदत होईल, याची खात्री आहे. हे चॅनेल ‘लोकांचा आवाज’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास वाटतो, असे सतेज पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

 

Advertisement