कोरोना चे वातावरण गंभीर असताना कोरोनाग्रस्तांना व्यवस्थित दवाखाने आणि उपचार मिळणे ही राज्य सरकारची प्राथमिकता आहे. मात्र, यामुळेच अनेक डॉक्टर गोळ्या औषधांचा काळाबाजार करून अधिकाधिक पैसे रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांकडून लाटण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टीला आळा घालण्यासाठी सर्व तर्हेचे प्रयत्न प्रत्येक स्तरातून होत असताना शिरूर मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे असलेले मोरया हॉस्पिटल तुमच्यापैकी प्रत्येक जणाला माहीतच असेल. याच हॉस्पिटल आणि येथील डॉक्टर विरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रार दाखल करण्यासारखे नेमके काय झाले? असे तुम्हाला वाटत असेल तर अगदी मुन्नाभाई एमबीबीएस प्रमाणे एक भयानक प्रकार येथे घडला आहे. कर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ बाभुळगावकर यांनी मोरया हॉस्पिटलच्या मुन्नाभाई डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली आहे.
शिरूर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ दामोदर यांनी फोनवरून डॉ बाबुळगावकर यांना अशी माहिती दिली होती की, कारेगाव येथील मोरया हॉस्पिटल हे बोगस आहे आणि अशी माहिती मिळाल्याने तुम्ही खात्री करून घ्या, असेही सांगितले होते.
त्यानुसार डॉ. बाभूळगावकर यांनी मोरया हॉस्पिटल येथे जाऊन खात्री केल्यानंतर त्या हॉस्पिटलचे डॉक्टर मेहमूद फारुक शेख राहणार पीर बुऱ्हाणपूर, तालुका, जिल्हा नांदेड यांनी महेश पाटील असे खोटे नाव धारण करून रजिस्ट्रेशन नंबर 2015/06 /3804 याचा वापर करून महेश पाटील यांच्या वैद्यकीय पदवीच्या सर्टिफिकेटवर स्वतःचा फोटो लावला आणि बनावट सर्टिफिकेट तयार करून मोरया नावाचं हॉस्पिटल सुरूही केले.
त्या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर देखील कार्यान्वित केले असल्याचे या चौकशीदरम्यान निदर्शनास आले. स्वतःला डॉक्टर म्हणवणार्या मेहमूद फारुख शेख याने हॉस्पिटलचे प्रमाणपत्र नोंदणी केलेले नसताना आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे ज्ञान प्राप्त नसताना तो सदर हॉस्पिटल चालवतच कसा होता? हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्याची प्रमाणपत्रेही शासन निर्णयानुसार ग्राह्य नाहीत आणि मुंबई नर्सिंग होम ऍक्ट अंतर्गत हॉस्पिटल ची नोंदणी ही नाही.
महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम 1961 अंतर्गत कलम 33(2) नुसार हा अपराध असून या बोगस डॉक्टर ने कोरोनाग्रस्तांच्या जीवाशी देखील खेळ केला आहे. दरम्यान, आज सकाळी एका कोरोना रुग्णाचा याच हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्यानंतर मयत रुग्णांच्या नातेवाईकांनी या डॉक्टरची चांगली धुलाई देखील केली आहे.
या रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरच्या शिक्षणाबाबत शंका निर्माण झाली आणि त्यानंतर हे सगळे प्रकरण बाहेर आले आहे. मेहमूद फारुख शेख याला अटक करण्यात आली असून, त्या ठिकाणी उपचार घेत असलेले कोरोनाग्रस्त हे एकूण 22 होते. त्या सर्व जणांना इतर ठिकाणी हलविण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs