SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लॉकडाऊनच्या काळात कर्जाचा हप्ता भरण्याचं टेन्शन, ‘कसं’ कराल नियोजन, वाचा सविस्तर..

लॉकडाऊनच्या वेळेत आधी घेतलेले कर्ज फेडण्याची वेळ आली पण तीही त्रासदायक ठरतेय, असं कर्जदारांना वाटणं साहजिकच आहे. समजा तुम्हाला कर्जाचा हफ्ता भरायचा आहे, तुम्ही घरासाठी 10 वर्षांपूर्वी 40 लाख रुपये कर्ज घेतलं आणि त्याचा 40,000 हजार रुपये हफ्ता बसला.

हप्ते भरताना….

Advertisement

कर्जाचे हप्ते फेडायचे आहेत म्हणून तुम्ही तुमचे खर्च आटोक्यात आणतात किंवा योग्य मॅनेजमेंट करून, हप्ता भरतात. तुमच्या घरातील दोघं कमावते असल्यास, गलेलठ्ठ पगार असल्यास तुम्हाला दोघांना मिळून 40,000 रुपये हप्ता काही फार नाही असं वाटतं. याचा अर्थ असाही होईल की तुमचा कर्जाचा हप्ता पगारावरच अवलंबून असतो आणि आणि जरी नसला तरी ऐन लॉकडाऊनमध्ये तुम्हाला हप्ता भरायचा आहे तर तुमच्याकडे असे कोणते मार्ग आहेत जेथून तुम्हाला पैसे येतात. तुमची सेव्हिंग तुमचा आशा वेळी काही हलाखीची वेळ सांभाळून घेऊ शकते. म्हणून बचत ही हवीच!

पैशांची कमी नसली तर 10 हजाराने हप्ता वाढवून घ्यावा की त्या 10 हजारांची एसआयपी करावी असा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे मुख्य प्रश्न हाच की, हप्ता वाढवू का म्हणजे लोन लवकर फिटेल? तर सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर दोन अधिक दोन चार असं देताना आपण विचार करायला हवाच.

Advertisement

कशाकशाचा विचार करायला हवा?

कर्ज म्हणजे ओझं असं आपल्याला वाटतं. काही जण अस म्हणतात की, कर्ज डोक्यावर असलं तर झोप येत नाही, नको ते ओझं, कधी एकदा कर्ज फेडू, असं त्यांना होतं. तसं असेल तर मग तुम्ही स्वत:ला विचारा की, कर्ज घेताना आपण फेडायचे आहे, ही जबाबदारी घेतली आहे ना? आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक नियोजन केलं आहे ना?

Advertisement

आता तुम्ही पद्धतशीरपाने वेळेवर या कर्जातून मुक्त झालात, तर चांगलंच आहे. अजून एक म्हणजे जे 10 हजार तुमच्या हातात आहेत ते एसआयपी केले, ते वाढत गेले , पुढच्या 15 वर्षांत ते भरपूर वाढले तर ते जास्त सुख देईल? असंही वाटलं असेल, मग आपण कधी कधी हातात पैसे उरले नाहीत तर स्वतःला मनःस्ताप करवून घेतो.

खरं तर यात चूक – बरोबर असं काही नाही. तुमची मनोवृत्ती कशी आहे यावर हा निर्णय होईल. आपण आता ही लॉकडाऊनची स्थिती कशी हाताळतो, हे पाहा. योग्य निर्णय घेऊन कर्ज घ्या किंवा हप्ते भरा.

Advertisement

मुख्य म्हणजे त्याही पलीकडे हप्ता वाढवण्याचा निर्णय घेताना याचा विचार करा की आपल्याला जी आताची आमदनी आहे ती अजून किती वर्षे टिकेल, कमी होईल? आपलं वय काय? हे उत्पन्न किती वर्षे मिळेल, निवृत्तीसाठी किती वर्षे उरली आहेत. निवृत्तीला पाचच वर्षे बाकी असतील तर कर्ज फेडून टाकणं उत्तम.

सध्या इतिहासात कधी नव्हे ते कर्ज स्वस्त आहे, पॉवर ऑफ कम्पाउंडिंग हे आपण शाळकरी वयात शिकलेलो असतो. त्यामुळे दरमहा 10 हजार जर आपण नीट सुरक्षित गुंतवले तर त्यातून पंधरा वर्षांनी काय लाभ होईल याचा विचार करा

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement