दिवसेंदिवस व्हाट्स अँपचा वापर वाढताना दिसत आहे. ज्याच्या हातात स्मार्टफोन, त्याच्या हातात आता व्हाट्स अँप आले आहे. त्यामुळे प्रत्येकालाच आता “कर लो दुनिया मुठी में’ असे वाटत असते.
कोणत्याही गोष्टीचा वापर सावधपणे करणे आवश्यक असते, नाहीतर त्याचे दुष्परिणामही भोगावे लागू शकतात. तसेच व्हाट्स अँपचेही आहे. या अँपचा वापरही जपूनच करायला हवा.. अन्यथा तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते..व्हाट्स अँप वापरताना काय काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत आपण जाणून घेऊ या..
समाजात तेढ निर्माण करणारे पोस्ट पाठवू नका..
अनेकदा आपल्याकडून नकळत जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज पाठविले जातात. त्यातून कोणाच्या तरी धार्मिक भावना दुखावतात नि दोन समाज आमने-सामने येतात. त्यामुळे याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा त्यातून तुम्हीच अडचणीत येऊ शकता.
कोणत्याही चित्रपटाची पायरेसी लिंक किंवा 21 दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे मेसेज पाठवत असाल, तर तुमचे अकाउंट बंद केले जाऊ शकते. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, की व्हॉट्स अॅपचा मेसेज एन्क्रिप्ट केलेला आहे, मग मेसेजमध्ये काय लिहिले आहे, हे दुसऱ्यांना कसे समजते? जर एखाद्याने तुमच्याविरुद्ध तक्रार केली, तर त्यावेळी तुमचे मेसेज पाहिले जाऊ शकतात.
तसेच व्हॉट्स अॅपवर धमकावणी, धमकावणारे असभ्य मेसेज पाठवल्यास ते धोकादायक ठरू शकते. तुमच्याविरुद्ध एखाद्याने तक्रार केली, तर तुम्हाला नाहक पोलिस ठाण्याची हवा खावी लागू शकते.
व्हॉटस अँपवर कुणालाही भडकावणारे मेसेज पाठविणे मोठे धोकादायक ठरू शकते. असे काही मेसेज फॉरवर्ड केले, तरी तुम्ही अडचणीत याल. तसेच व्हाट्स अँपवर कुणाला आत्महत्येसाठी भाग पाडणे, हाही एकप्रकारे गुन्हा मानला जातो.
कायद्यानुसार असे चुकीचे मेसेज पाठवल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. बल्क मेसेज पाठवणेही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ते टाळायला हवे. तसेच सॉफ्टवेअर हॅक करणारे मेसेज पाठवल्यास त्यावरही कारवाई होऊ शकते.