SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

संघर्ष असावा तर असा! ट्रक चालकाचा मुलगा बनला आता राजस्थान रॉयल्सचा बेस्ट बॉलर; आयपीएलमध्ये ‘इतक्या’ कोटींना लागली बोली!

आयपीएल म्हणजे नवोदीत खेळाडुंचा भरणा असलेली स्पर्धा असं म्हणता येईल. त्यांना काहीतरी करून दाखवण्याचं हक्काची स्पर्धा ही वाटत असते. निवड होण्यापासून ते संभाव्य 11 खेळाडुंमध्ये निवड होईपर्यंत जी धकधक असते, त्यासाठी सर्वात महत्वाचा त्यांचा सराव, कामगिरी, आणि प्रभावी फलंदाजी, गोलंदाजी वा क्षेत्ररक्षण अशा गोष्टींमध्ये प्रभाव दाखवणं गरजेचं असतं.

एकदा का 11 खेळाडुंमध्ये स्थान मिळालं की मग संपूर्ण टीम अशा अनुभवी खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतच असतात. राजस्थान रॉयल्सकडून संधी मिळालेल्या वेगवान गोलंदाज चेतन सकारिया या जिद्दी खेळाडूनेही तेच स्वप्न पाहिलं. पंजाब विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात हिरो ठरलेला आपल्या गोलंदाजीचा प्रभाव दिसावा यासाठी चेतन सकारिया पहिल्या चेंडुपासून प्रयत्न करत होता.

Advertisement

…आणि अफाट प्रयत्नांना आलं यश :

चेतन सकारियाची ही आयपीएल कारकिर्दीतली पहिली सर्वोत्तम कामगिरी राजस्थानच्या चेतन सकारियाने आपल्या गोलंदाजीचं उत्तम प्रदर्शन करत सर्वात प्रथम 14 धावांवर खेळत असलेल्या मयंक अग्रवालला सॅमसनच्या हाती झेल देत त्याने बाद केलं आणि पंजाबचे महत्वपूर्ण 3 गडी बाद केले. विशेष म्हणजे सेट असलेल्या केएल राहुलला त्याने बाद केले. राहुल तेवतियाने सीमेवर त्याचा अप्रतिम झेल घेतला. चेतनने अखेरच्या चेंडुवर रिचर्डसनला बाद केलं. 4 षटकात 31 धावा देत त्याने 3 गडी बाद केले. ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर सकारियाने एक अप्रतिम झेलही टीपला. पंजाबच्या निकोलस पूरनचा त्याने उडी मारून झेल घेतला.

Advertisement

आयपीएल 2021 च्या लिलावात चेतनची बेस प्राईस 20 लाख रुपये इतकी होती. मात्र त्याची चांगली गोलंदाजी पाहता राजस्थानने त्याला 1.2 कोटी रुपये देत खरेदी केलं आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष लागून आहे.

चेतनचा संघर्षमय प्रवास : 

Advertisement

चेतनला राजस्थान रॉयल्स संघामध्ये येण्यापर्यंत खूप संघर्ष करावा लागला. हा प्रवास खूपच खडतर आहे, चेतनचे वडील ट्रक ड्रायव्हर होते आणि काही काळानंतर ते गुजरातमध्ये टेम्पो चालवू लागले. चेतनला क्रिकेटची प्रचंड आवड तेव्हापासून आहे. काही वर्षांपूर्वी चेतन सकारियाकडे क्रिकेट खेळण्यासाठी लागणाऱ्या बॅट,बॉल, पॅड अशा कितीतरी आवश्यक वस्तूही नव्हत्या, असं चेतनने एका मुलाखतीत सांगितलं होतं. भावसिंहजी क्रिकेट अकादमीने त्याला क्रिकेटचं ट्रेनिंग देण्यासाठी फी सुद्धा घेतली नसल्याचं त्याने सांगितलं. या काही चांगल्या गोष्टींमुळे मी आता इथवर येऊन पोहोचलो, असंही तो सांगण्यास विसरला नाही.

चेतन सकारियाने 2017-18 सालच्या विजय हजारे स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सुरुवात केली होती. रवींद्र जडेजा तंदुरुस्त नव्हता, त्यावेळी त्याला संधी मिळाली आणि पण चांगली कामगिरी त्याला त्यावेळी करता आली नव्हती. पण एक चांगली गोष्ट अशी घडली की, रवींद्र जडेजाने त्याचं मनोबल वाढवलं आणि पुन्हा जोशात, नव्या दमाने मैदानात उतरत 2 गडी बाद केले. चेतनने घरच्या क्रिकेटमध्ये आतापर्यंत 16 टी-20 सामना खेळले आणि यात त्याने 28 गडी बाद केले आहेत. त्याची बेस्ट कामगिरी म्हणजे 11 धावा देत 5 गडी बाद केल्याची कामगिरी आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement