SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा उसळी, पहा कितीने झालीय वाढ?

नवी दिल्ली – मागील दोन दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी (ता. १३ एप्रिल) भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. मंगळवारी जुनं फ्युचर्स गोल्ड 0.20 टक्क्यांच्या वाढीसह मल्टी कमोडिटी एक्सचेंज ((MCX) वर व्यापार करीत आहे. दुसरीकडे मे वायद्याच्या चांदीच्या किमतींत 0.37 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या आठवड्यात अमेरिकन बाँडच्या उत्पादनात झालेल्या वाढीमुळे सोन्यात चढउतार पाहायला मिळत आहेत.

एमसीएक्सवरील वायदा सोन्याचा भाव 95 रुपयांनी वाढून 46,514 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील व्यापार सत्रात सोन्याच्या किमती 0.41 टक्क्यांनी घसरल्या होत्या.

Advertisement

एमसीएक्सवरील मे फ्यूचर्स चांदीची किंमत 247 रुपयांनी वाढून 66,375 रुपये प्रति किलो झाली. मागील व्यापार सत्रात चांदी 1.3 टक्क्यांनी घसरली होती.

यंदाच्या वर्षात आतापर्यंत सोने 3,500 रुपयांनी कमी झालेय. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने प्रतितोळा 56,200 रुपयांच्या उच्च किमतीपर्यंत गेले होते. त्या तुलनेत सोन्याच्या किमतीत 10,000 रुपयांची घसरण झालीय.

Advertisement

वाढती कोरोना जोखीम, स्थानिक लॉकडाऊन आणि रात्रीच्या कर्फ्यूमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास ढासळतोय. त्यामुळे ते पुन्हा सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात 2020-21मध्ये गुंतवणूकदारांनी गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडात 6,900 कोटीची गुंतवणूक केली.

सोन्याचे ईटीएफ गुंतवणुकीचे हे सलग दुसरे आर्थिक वर्ष आहे. त्याचबरोबर 2013-14पासून गोल्ड ईटीएफमधून वारंवार पैसे काढले जात होते.

Advertisement

यंदा जूनपर्यंत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकेल. या वर्षाच्या अखेरीस सोने 48 ते 50 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत वाढ होऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

शेअर बाजारावर कोरोनाचा परिणाम दिसू लागला आहे. अशा वेळी सोन्यात गुंतवणूक केल्यास अधिक फायदा होईल. दिवाळीपर्यंत पुन्हा सोने 50 हजारांवर पोहोचू शकते. तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी 10 ते 20 % गुंतवणूक सोन्यात करावी. दागदागिन्याची खरेदी ही गुंतवणूक मानली जात नाही. आपण आपल्या गरजेनुसार ते कधीही खरेदी करू शकता, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement