SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्रात १५ दिवसांसाठी संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर आज (ता.13) रात्री राज्यात पुढील १५ दिवसांसाठी संचारबंदीची घोषणा केली. त्यानुसार राज्यात १५ ते ३० एप्रिलदरम्यान हा निर्णय लागू असणार आहे. उद्या (बुधवार) रात्री ८ वाजेपासून राज्यात कडक निर्बंध लागू होणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी राज्यात कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. त्यामुळे राज्य सरकारसमोर दुसरा पर्याय राहिला नसल्याचे ते म्हणाले.

Advertisement

 

सुरुवातीला गुढीपाडव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की आतापर्यंत सर्वांशी संवाद साधला. कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. रेमडीसीव्हर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. रोज २ लाख कोरोना चाचण्या करीत आहोत. आपण रुग्णसंख्या लपवत नाही. मात्र, ऑक्सिजन कमी पडतोय. दुसऱ्या राज्यातून ऑक्सिजन मागवत आहोत. तसे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

Advertisement

 

ते म्हणाले, की जीएसटी परताव्याच्या मुदतवाढीसाठी साठी पंतप्रधान मोदी यांना विनंती करणार आहे. आताची लाट प्रचंड मोठी आहे. लसीकरणाची संख्या वाढवावी लागेल. रुग्णवाढ भयावह आहे. बेडची संख्या वाढवावी लागेल. व्हेन्टिलेटरची संख्या वाढवत आहोत.

Advertisement

 

राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने बाधित आढळून येत आहेत. शिवाय रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू करूनही संसर्ग कमी होत नसल्याचे दिसत आहे.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला उद्देशून समाजमाध्यमांवरून आज (मंगळवार) रात्री साडेआठ वाजता संबोधित करणार असल्याचे जाहीर केल्यापासूनच राज्यात लॉकडाऊन जाहीर केले जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मुख्यमंत्री नेमका कोणता निर्णय जाहीर करणार, याकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले होते. अखेर मुख्यमंत्री ठाकरे यांनी १५ दिवसांसाठी संचारबंदी जाहीर केली.

मागील काही दिवसांपासून ठाकरे यांनी तज्ज्ञांसह सर्वपक्षीय बैठक घेत विरोधी पक्षांसह राज्यभरातील नेते मंडळींशी देखील चर्चा केलेली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत चर्चा केली होती.

Advertisement

 

काय सुरु राहणार?

Advertisement

पेट्रोलपंप सुरु राहणार

आवश्यक सेवा

Advertisement

हॉटेलची पार्सल सेवा, मात्र, कर्मचाऱ्यांची चाचणी बंधनकारक

बससेवा व लोकल सुरु राहील

Advertisement

काय मिळणार?

– नागरिकांना महिनाभर मोफत शिवभोजन

Advertisement

– अन्न सुरक्षा योजनेतील प्रत्येकी ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत

– राज्यातील ७ कोटी लोकांना मोफत धान्य दिले जाईल.

Advertisement

– अधिकृत फेरीवाल्याना १५०० रुपये मदत

– आदिवासी कुटुंबाना २ हजार

Advertisement

– दिव्यांगांना १ हजार रुपये आगाऊ रक्कम

– परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रुपये मदत

Advertisement

 

 

Advertisement