SpreadIt News | Digital Newspaper

राज्यात लॉकडाऊन लागणार का? कालच्या सर्वपक्षीय बैठकीत ‘हा’ झाला निर्णय..

0

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज व्यक्त केली असली तरी ती तातडीने लागू केली जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत म्हटलं आहे.

बैठकीत काय झालं?

Advertisement

▪️ वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता दोन आठवड्यांच्या कडक टाळेबंदीची शिफारस तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृती दलाने केल्याने टाळेबंदीबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला असून, येत्या 2-3 दिवसांत टाळेबंदीचा निर्णय घेतला जाण्याची चिन्हे आहेत.

▪️ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक काल संपन्न झाली. 13 तारखेला गुढीपाडवा आहे व 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनंतर टाळेबंदीचा निर्णय घेतला जाईल. 15 एप्रिलपासून राज्यात टाळेबंदी लागू केली जाऊ शकते.

Advertisement

▪️ टाळेबंदी किती दिवसांची करावी लागेल, याबाबत परिस्थिती पाहून सुरुवातीला काही दिवसांची टाळेबंदी होणार आहे. त्यानंतर ताळेबंदीच्या परिणामानुसार पुढील काही दिवस पुन्हा टाळेबंदी लागू केली जाऊ शकते.

▪️ कॅबिनेट बैठकीत याबाबत आढावा घेऊन लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आरोग्य सुविधा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

▪️ ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुचिधा वाढवण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

▪️ रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

Advertisement

▪️ प्राणवायू उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, खाटांची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही आदी मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली.

टास्क फोर्सने मांडल्या सूचना-

Advertisement

केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते त्यादृष्टीने जनजागृती करावी. सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन लाऊन तात्पुरती गरज भागवावी.

मुंबई पालिकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे, डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला 6 मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement