SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

60 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी जगात पहिल्यांदा मानवाने केली पृथ्वी प्रदक्षिणा… जाणून घ्या व्यक्ती आणि मोहिमेविषयी!

चंद्रावर पहिल्यांदा पाय ठेवणारा माणूस म्हंटलं की, आपल्यालाच नील आर्मस्ट्रॉंग यांचे नाव आठवते. मात्र, अंतराळात पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा माणूस म्हटलं की, आपल्याला डोके खाजवायची वेळ येते. याच माणसाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्याने तब्बल 60 वर्षांपूर्वी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली होती.

9 मार्च 1934 रोजी रशियामध्ये जन्म घेतलेले युरी गॅगारीन यांनी 60 वर्षांपूर्वी असा पराक्रम करून दाखवला होता, ज्यामुळे जगाने तोंडात बोट घातले होते.

Advertisement

12 एप्रिल 1961 रोजी केवळ 108 मिनिटांमध्ये अंतराळात पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले अंतराळवीर म्हणून ते जगभर गाजले. आज या ऐतिहासिक घटनेला 60 वर्षे पूर्ण झाली आहेत.

या काळात फक्त रशियात नव्हे तर पूर्ण जगभर फक्त युरी गॅगारीनची चर्चा होती. आपण पुराणातल्या कथा वाचतो तेव्हा, आपल्याला लक्षात येते की कार्तिकस्वामी ही पृथ्वी प्रदक्षिणा करणारे देव म्हणून ओळखले जातात. मात्र, एका मानवाने अशा प्रकारचे धाडस करून इतिहास घडवणे ही काही सोपी गोष्ट नाही.

Advertisement

या अंतराळ प्रदक्षिणेसाठी व्होस्टोक या अंतराळ यानाचा उपयोग त्यांनी केला. 27400 किलोमीटर ताशी वेगाने या अंतराळ याने प्रवास करून पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

योजना आखणी : 

Advertisement

युरी गॅगारीन यांनी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्याआधी व्होस्टोक सारखे एक अंतराळ यान आणि त्यामध्ये एक डमी मानव बसवून त्याच्यासोबत एक श्वान अंतराळात पाठवण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर युरी यांना ही प्रदक्षिणा करण्याची परवानगी मिळाली. पृथ्वीवरून प्रत्येक गोष्ट कंट्रोल होत असताना आपत्कालीन परिस्थितीमध्ये युरी यांच्याकडे एक कोड पाठवला जाणार होता. मात्र, असे काहीच न होता युरी सुखरूप अंतराळातून पृथ्वीवर परतले आणि पृथ्वीप्रदक्षिणा करणारे जगातले पहिले मानव ठरले.

➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement