SpreadIt News | Digital Newspaper

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सापडलाय ‘हा’ वयोगट!

0

मुंबई – गेल्या वर्षी सुरु झालेला कोरोनाचा कहर यंदा तर दुपटीने वाढला आहे. त्यातही सुरुवातीला कोरोनामुळे ज्येष्ठ, वयोवृद्ध नागरिकांना अधिक धोका असल्याचे समोर आले. अजूनही वृद्धांसमोरील धोका कमी झालेला नाही. मात्र, आता कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत एक वेगळाच वयोगट धोक्यात आल्याचे दिसत आहे. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा..!

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ५० ते ६० वयोगटातील व्यक्तींमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक होते. राज्यात अनलॉकनंतर कामानिमित्त, तसेच शैक्षणिक कारणांसाठी बाहेर जाणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण रुग्णसंख्येचे प्रमाण अधिक दिसते. यातही सहआजार असलेल्या तरुणांचे प्रमाण जास्त आहे. तसेच प्रतिकारशक्ती चांगली असल्याने वैद्यकीय उपचारासाठी तरुण खूपच विलंबाने जात असल्याचे दिसून येते.

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३१ ते ४० वयोगटातील नागरिक मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत आहेत. राज्यभर हेच चित्र आहे. संसर्गाचे प्रमाण या वयोगटात २१.५३ टक्के असून, त्याखालोखाल ४१ ते ५० या वयोगटामध्ये हे प्रमाण १८.१० टक्के दिसून आले.

राज्यातील ७ लाख १२ हजार २१५ व्यक्तींना संसर्ग झाला असून ४१ ते ५० या वयोगटामध्ये ५ लाख ९७ हजार ९७७ व्यक्ती बाधित झाल्या आहेत. २१ ते ३० या वयोगटामध्येही संसर्गाचे प्रमाण अधिक असून या गटातील ५ लाख ५७ हजार ९१४ जणांना करोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण टक्केवारीमध्ये १६.८५ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे.

Advertisement

त्या खालोखाल ५१ ते ६० या वयोगटातील १५.८८ टक्के म्हणजे ५,२२,८८५ व्यक्तींना करोना संसर्गाची लागण झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांकडून संसर्गाची लागण ज्येष्ठ नागरिकांनाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यात ३१ ते ४० या वयोगटात ३३ लाख ७३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे, ७१ ते ८० वयोगटामध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण पहिल्या लाटेच्या तुलनेत अतिशय कमी, म्हणजे ५.२७ टक्के इतके नोंदले गेले आहे.

Advertisement

ज्येष्ठ नागरिकांमध्ये संसर्ग कमी होण्याचे एक कारण लसीकरणही असू शकते. राज्यातील ६१ टक्के पुरुष, तर ३९ टक्के स्त्रियांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या एकूण चाचण्यांपैकी १७ टक्के पॉझिटिव्ह येत आहेत.

मुंबईतील आकडे
मुंबईत ३० ते ३९ वयोगटातील ९२ हजार ७५६ जणांना कोरोना झाल्याचे दिसते. यात पुरुषांचे प्रमाण ६४ टक्के, तर स्त्रियांचे प्रमाण ३६ टक्के नोंदले गेले आहे. ५० ते ५९ वयोगटात संसर्गाचे प्रमाण ९० हजार १५५ इतके असून त्यात पुरुषांचे प्रमाण ६२ टक्के, तर स्त्रियांचे प्रमाण ३८ टक्के आहे. ४० ते ४९ या वयोगटातील ८७ हजार ७४० जणांना करोनासंसर्ग झाल्याची नोंद मुंबई महापालिकेने १० एप्रिलच्या अहवालामध्ये केली आहे.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement