एखाद्या गोष्टीच्या शोधात शास्त्रज्ञ पूर्ण जीवन पणाला लावतात.. पण बरेचदा त्यांना हवा तसा शोध काही लागत नाही.. त्यांचा शोध कधी वाया जातो, तर कधी त्यातूनच नवे काही जन्माला येते. काहीतरी शोधताना अशाच काहीशा वेगळ्या गोष्टींचा शोध चुकून लागला. मात्र, आता या वस्तूशिवाय आपले पानही हलत नाही..
कोणत्या अशा वस्तू आहेत, त्यांचा शोध कसा लागला, शास्त्रज्ञांना नेमका कशाचा शोध घ्यायचा होता, याबाबत जाणून घ्यायचे असेल, तर ही बातमी वाचा..
काही वैज्ञानिकांकडून नकळत झालेल्या चुकीमुळे अशा काही गोष्टींचा शोध लागला.. मात्र आज त्या आपल्या महत्वाच्या गरजा पूर्ण करीत आहेत.
१. एक्स-रे (X -ray)
भौतिकशास्त्रज्ञ विल्यम रोनट जेन यांनी सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी १८९५ मध्ये एक्स रे चा शोध लावला. नव्हे तर लागला. ते प्रयोगशाळेत कॅथोड रे ट्यूबमध्ये काही तरी परीक्षण करीत होते. त्यांच्यापासून काही अंतरावर पडदा चमकत होता. त्यांनी खाली पहिले, तर अपारदर्शक असूनही खाली ठेवलेले कागद दिसत होते.. त्यांनी एक फोटो फिल्म डेव्हलोप केली असता, प्लेटवर हाताचे हाड स्पष्ट दिसत होते. अशा प्रकारे एक्स रे चा शोध लागला..
२. स्प्रिंग (slinky )
स्प्रिंगचा शोध १९४३ मध्ये स्वीडिश नेवीमधील इंजिनियर रिचर्ड जोन्स यांनी लावला. युद्ध नौकेवरील विजेवर नजर ठेवण्यासाठी जोन्स एक यंत्र बनवत होता. त्यावेळी बनवलेली एक वस्तू चुकून खाली पडली आणि एकदम उसळली. त्यातून लागला स्प्रिंगचा शोध.
३.प्रिंटर (printer)
प्रिंटरशिवाय सध्या कोणतेही कार्यालयीन काम पूर्ण होत नाही. मात्र या प्रिंटरचा शोधही असाच चुकून लागला आहे. एका इंजिनिअरने चुकून पेनवर गरम आयरन ठेवले. काही वेळाने पेनातून शाई बाहेर येऊ लागली. त्यातूनच पुढे इंक जेक प्रिंटरचा शोध लागला.
४. मायक्रोवेव्ह (Microwave)
शास्त्रज्ञ पर्सी स्पेन्सर यांच्याकडून नकळत मायक्रोवेव्हचा शोध लागला. नवीन व्हॅक्युम ट्यूबद्वारे रडारशी संबधीत शोध ते घेत होते. प्रयोग करीत असताना अचानक त्यांच्या खिशातील कॅण्डीच्या पट्ट्या वितळू लागल्या. दुसऱ्या वेळी प्रयोग करताना त्यांनी मशीनमध्ये पॉप कॉर्न टाकले असता, ते तडतडू लागले नि मायक्रोवेवचा शोध लागला.