SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गेमर्ससाठी 18GB रॅम, 24MP कॅमेरा असणारा तुफान स्मार्टफोन, ‘या’ जबरदस्त स्मार्टफोनची होतेय 15 एप्रिलपासून विक्री!

भारतातील गेम खेळणाऱ्या मुलांसाठी Asus ROG Phone 5 भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन 15 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

या स्मार्टफोनचे 3 वेरिएंट्स : 

Advertisement

ROG Phone 5, ROG Phone 5 Pro, ROG Phone 5 Ultimate (Limited एडिशन) या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. कंपनीने या तिन्ही मॉडल्समध्ये 144Hz चा सॅमसंग AMOLED डिस्प्ले दिला आहे जो ROG Phone 3 पेक्षा 23 टक्के जास्त ब्राईट आहे. ROG Phone 5 चे तिन्ही स्मार्टफोन्स Qualcomm Snapdragon 888 ने सुसज्ज आहेत.

रॅम, किंमत आणि स्टोरेजबद्दल…:

Advertisement

▪️ ROG Phone 5 मध्ये 8GB आणि 12GB RAM ऑप्शन, ROG Phone 5 Pro मध्ये 16GB RAM, ROG Phone 5 Ultimate मध्ये 18GB RAM आहे.

▪️ भारतामध्ये फँटम ब्लॅक अँड स्टॉर्म व्हाइट कलरसह असणाऱ्या Asus ROG Phone 5 च्या 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये इतकी आहे, 12 जीबी + 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 57,999 रुपये आहे.

Advertisement

▪️ फँटम ब्लॅक शेडमध्ये सादर केलेल्या Asus ROG Phone 5 Pro च्या 16 जीबी + 512 जीबी स्टोरेज फोनची किंमत 69,999 रुपये आहे

▪️ Asus ROG Phone 5 Ultimate च्या 18 जीबी + 512 जीबी स्टोरेज फोनची किंमत 79,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Advertisement

Asus ROG Phone 5 चे फीचर्स :

◼️ Asus ROG Phone 5 स्मार्टफोन Android 11 आधारित ROG UI आणि ZenUI कस्टम इंटरफेसवर ऑपरेट होतो. यामध्ये 6.78 इंचांचा फुल एचडी+एमोलेड डिस्प्ले 20.4: 9 च्या ॲस्पेक्ट रेश्योसह येतो, त्याचा रीफ्रेश रेट 144 हर्ट्ज एवढा आहे. याशिवाय डिस्प्लेमध्ये DC Dimming सपोर्ट देण्यात आला आहे आणि तो Corning Gorilla Glass Victus ने प्रोटेक्टेड आहे.

Advertisement

◼️ हा स्मार्टफोन ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 एसओसी प्रोसेसरवर चालतो. हा Adreno 660 GPU आणि 18 जीबी रॅमसह येतो. याशिवाय फोनमध्ये ऑल न्यू थर्मल डिझाईन दिलं आहे, ज्याला GameCool 5 म्हणतात.

◼️ या फोनला AirTrigger 5, ड्युअल फ्रंट-फायरिंग स्पीकर्स, मल्टी अँटिना, वाय-फाय आणि क्वाड माइक नॉईस कॅन्सलेशन करणारे अ‍ॅरेदेखील देण्यात आले आहेत. खास म्हणजे सर्वोत्तम गेमिंग अनुभवासाठी आपल्याला एक अल्ट्रासोनिक बटण मिळेल. त्याच वेळी, ROG Phone 5 Ultimate च्या मागील कव्हरमध्ये 2 जास्तीचे कॅपेसिटिव्ह एरियाज आहेत.

Advertisement

◼️ Asus ROG Phone 5 चा कॅमेरा आणि बॅटरी – या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो शूटरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप,फोनच्या फ्रंट पॅनलवर तुम्हाला 24 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल.

◼️ Asus ROG Phone 5 मध्ये 512 जीबी पर्यंत स्टोरेज स्पेस आहे, ही स्पेस वाढवता येऊ शकत नाही, परंतु त्यात एक्सटर्नल HDD चा सपोर्ट देण्यात आला आहे. एक्सटर्नल एक्सेसरीजसाठी यात पोगो पिन कनेक्टर आहे. याशिवाय या फोनमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000 एमएएचची ड्युअल सेल बॅटरी दिली आहे.

Advertisement

◼️ ROG Kunai 3 गेमपॅड, प्रोफेशनल डॉक, ROG क्लिप आणि लाइटिंग आर्मर केससुद्धा बाजारात सादर केली आहे. याव्यतिरिक्त हा फोन AeroActive Cooler 5 सोबत येतो, ज्यात दोन फिजिकल एअर ट्रिगर बटण, एक किकस्टँड आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement