आजकाल प्रत्येक जण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. आपली मते मांडायला आपल्या भावना आणि आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करायला किंवा मित्रमंडळींच्या सोबत या गोष्टी शेअर करायला प्रत्येकालाच आवडते.
अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्यामुळे अंतराचे बंद तोडण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना लोक आपल्याला आजकाल दिसतात. या सर्वांमध्ये अनेक लोक असेही असतात ज्यांना आपण ओळखतही नाही.
मात्र ती लोक आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, किंवा उगाचच मेसेज करणे, अगदी आपल्या पर्सनल फोटोज वर कमेंट करणे, अशा गोष्टी करत राहतात. आपल्यापैकी बरेच जण अशा लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरीही ही गोष्ट कधी ना कधी आपल्याला फेस करावीच लागते.
तुम्हीही अशाच लोकांपासून हैराण असाल तर फेसबुक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे फीचर लवकरच लॉन्च करणार आहे. याच फिचरद्वारे तुमच्या पोस्टवर किंवा तुमच्या फोटोवर कोणी कमेंट करावी हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला असणार आहे.
काय असणार आहे हे फिचर?
तुमच्या प्रोफाईलवर म्हणजेच फेसबुकच्या प्रोफाईलवर तुम्हाला ‘व्हू कॅन फॉलो मी’ असा ऑप्शन दिसेल. यावर पब्लिक पोस्ट कमेंट मध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमच्या पोस्टवर कोण कमेंट करणार याविषयी निर्णय घेऊ शकणार आहात. हे फिचर पहिल्यांदा अँड्रॉइडसाठी उपलब्ध होणार असून, त्यानंतर आय ओ एस यूजर साठी हे लॉन्च करण्यात येणार आहे. लवकरच फेसबुक याबाबत अधिकृत घोषणा देखील करेल.
➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs