SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुलांचे भवितव्य करा एस आय पी ने सुरक्षित; महिन्याला 5 हजार गुंतवून मिळवा इतके पैसे!

आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी प्रत्येक पालक गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधत असतो. सामान्य व्यक्तीने अनेक वर्ष गुंतवणूक केल्यानंतर त्याच्या पाल्याचे शिक्षण आणि एकंदरीत जीवन व्यवस्थित जाण्यासाठी मदत होते.

अगदी जास्तही नाही आणि खूप कमीही नाही अशी मध्यम स्वरूपाची एखादी रक्कम दर महिन्याला बाजूला ठेवून, पाल्याच्या शिक्षणाचा खर्च अनेक वर्ष आधीच तयार करून ठेवावा असे तुमच्या मनात असेल तर, एसआयपीचा पर्याय अगदी उत्तम आहे.

Advertisement

आज आपण जाणून घेणार आहोत, महिन्याला 5 हजार रुपये गुंतवून कोणती एसआयपी तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न देऊ शकते याबद्दल!

चाइल्ड म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे हा सगळ्यात चांगला उपाय असू शकतो. निदान पंधरा वर्षांची मर्यादा ठेवून ही गुंतवणूक सुरू केली तर, तुमच्या पाल्याच्या भवितव्यासाठी ही गोष्ट फायदेशीर ठरू शकते.

Advertisement

एसबीआय, आय सी आय सी आय, एचडीएफसी यासारख्या अनेक बँकांच्या एसआयपी आणि म्युच्युअल फंड तुम्हाला व्यवस्थित रिटन्स मिळवून देऊ शकतात.

एचडीएफसी

Advertisement

एचडीएफसी मध्ये तुम्ही एसआयपी काढणार असाल तर महिन्याला 5 हजार रुपये गुंतवले नंतर 16.16 टक्के व्याजदराने 15 वर्षानंतर तुम्हाला 30 लाख रुपये मिळू शकतात.

आय सी आय सी आय

Advertisement

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल चाईल्ड केअर फंड कडून लॉंच नंतर 15.48 टक्के व्याजदराने 5000 महिन्याला सेव्ह केल्यास, 15 वर्षानंतर 24 लाख मिळू शकतात.

एसबीआय

Advertisement

एसबीआयच्या मॅगनम चिल्ड्रन बेनिफिट फंड कडून 10.36 टक्के रिटर्न्स मिळतात. 5000 महिन्याला गुंतवल्यास 15 वर्षाने 20 लाख मिळतात.

बाजाराची स्थिती, योग्य मार्गदर्शन याद्वारे म्युच्युअल फंड मध्ये किंवा कोणत्याही एसआयपी मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरते. त्यानुसारच, पालकांनी आपल्या भवितव्यासाठी आणि पाल्याच्या भवितव्यासाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement