SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ रविवार, 11 एप्रिल 2021

मेष : आज आपल्या नवीन घरगुती व्यवसायाच्या शुभारंभ करण्यास अनुकूल दिवस आहे. नवीन वस्तूंची खरेदी कराल.आजचा दिवस आपल्यासाठी भाग्यकारक घटनांची पर्वणीच आहे. आपली सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल.

Advertisement

वृषभ : नोकरीतील मुलाखतीसाठी पत्र येईल. अपेक्षित गाठीभेटींचे आज योग आहेत. आपली मते आपण ठामपणे मांडाल व त्यावर अमलबजावणी करून घ्याल. कुटुंबात सुसंवाद साधलात तरच आपला निभाव लागणार आहे. आकर्षक खरेदी कराल.

मिथुन : सुवर्णखरेदीचा योग आहे. घरातील पूर्वनियोजित शुभसमारंभ पार पाडण्यासाठी आप्तस्वकियांची हजेरी लागेल. आर्थिक उन्नतीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

Advertisement

कर्क : आपले मनोबल उंचावणाऱ्या घटना घडतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. मुलांच्या शिक्षणाच्या संबंधीत असणाऱ्या प्रश्नांवर योग्य मार्ग निघेल. अचनाक अनावश्यक खर्च उद्भवतील.

सिंह : मित्र परिवाराबरोबर सहलीचे योग संभवतात, आज अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता राहते. आपल्या मृदु भाषणामुळे विरोधकांची मने जिंकून घ्याल. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्यादृष्टीने मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या जातील.

Advertisement

कन्या : आपल्याला गुंतवणूक करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. महत्वाच्या गाठीभेटीतून अपेक्षित घडामोडी घडतील.आपले अंदाज अचूक ठरतील. नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांची ओळखीतून कामे मार्गी लागतील.

तूळ : आज आर्थिक उलाढाली टाळाव्यात. नोकरी-व्यवसायाच्या वाढीसाठी अथक परिश्रम घ्यावे लागतील. जोडीदाराच्याआर्थिक प्रगतीच्या दृष्टीने आजचा र्दीवस अनुकूल आहे. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील.

Advertisement

वृश्चिक : आपल्या इच्छापूर्तीच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. भाग्यकारक घटनांच्या दृष्टीने आजचा दिवसशुभ आहे. आज आपल्या मित्रमैत्रिणींचे आपणांस सहकार्य मिळेल. अंधःश्रद्धेला बळी पडू नका.

धनु : व्यवसायातील जुनी येणी आज वसूल होतील. नोकरीत भाग्यकारक घटना घडतील. आपले कार्यक्षेत्र वाढल्यामुळे तेवेळत पूर्ण करण्याच्या दृष्टीने मनाची चलबिचल होईल, एखाद्या व्यक्तिच्या मदतीची गरज भासेल.

Advertisement

मकर : आजचा दिवस आपल्या संततीस शैक्षणिक-क्रीडा क्षेत्रात प्रगतीकारक ठरेल, आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीतकाही भाग्यकारक घटना घडतील. मित्र परिवाराला सहाय्य करावे लागेल.

कुंभ : आपले मन अस्वस्थ राहिल. मुलांच्या तब्येतीच्या तक्रारी राहतील. आज नोकरीत आर्थिक उन्नती होईल व आपल्यावरनवीन कामाची जबाबदारी वरिष्ठ सोपवतील. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील.

Advertisement

मीन : संततीसौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी आजचा दिवस चांगला आहे. महिला स्वतःच्या पद्धतीने गृह सजावट करतील.महिलांना बदलाची नितांत गरज भासेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement