SpreadIt News | Digital Newspaper

चुकीच्या स्पेलिंगचा ‘असा’ही फायदा, घ्या जाणून!

इंग्रजी जगाची भाषा.. जगभर फिरायचे तर ही भाषा आलीच पाहिजे. मात्र, अनेकदा लिहिताना इंग्रजी शब्दाच्या स्पेलिंगवर तितके लक्ष दिले जात नाही. हा डाग धुवून काढण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले जातात. मात्र, आता ‘कुछ डाग अच्छे होते है..’ असं म्हणावे लागेल. त्याला कारणही तसेच इंटरेस्टिंग आहे. चला तर मग चुकीचे स्पेलिंग कसे कामाला येते, ते जाणून घेऊ या..

मोबाईल असो वा कॉम्पुटर आपण प्रत्येक जणच त्याला काही ना काही पासवर्ड देत असतो. आपला पासवर्ड चोरला जाऊ नये, वा सहजतेने तो हॅक करता येऊ नये, असा पासवर्ड आपण देत असतो. मात्र, प्रत्येक गोष्टीत आता पासवर्ड आला आहे. त्यामुळे तो लक्षात ठेवणे, म्हणजे कटकटीचे काम झाले आहे. त्यामुळे आपण बऱ्याचदा नांव, जन्मतारीख, गाव वा जन्मस्थळाचे ठिकाण, टोपणनावे, अशा स्वरूपात पासवर्ड निवडतो.

Advertisement

पासवर्ड अधिक सुरक्षित बनविण्यासाठी त्यात नानाविध चिन्हांचा, आकड्यांचा वापर करावा, शक्यतो पासवर्ड अधिक शब्दाचा असावा, असे सल्लेही काही जाणकार देत असतात. मात्र, नव्या संशोधनातून असे आढळले आहे, की सुरक्षित पासवर्ड शोधणे अगदी सोपे असते. फक्त त्यासाठी तुमचे व्याकरण थोडे कच्चे असले पाहिजे. स्पेलिंगही तुम्ही चुकीची करीत असाल, तर त्यापासून बनलेले पासवर्ड अधिक सुरक्षित ठरतात, असे समोर आले आहे.

कार्नेजी विद्यापीठातील संशोधक अश्विनी राव या पासवर्ड क्रॅकींग सिस्टीमध्ये तज्ञ आहेत. त्या म्हणतात, “मोठी वाक्ये वा मोठी नांवे पासवर्ड म्हणून वापरली गेली असतील, तर सरावाने ती सहज गेस करता येतात. म्हणी, वाकप्रचारही सहज गेस होतात. पोस्टाचा पत्ता, ई-मेल अॅड्रेस हेही पासवर्ड म्हणून आता सुरक्षित राहिलेले नाही.”

Advertisement

अशुद्ध व्याकरण आणि चुकीचे स्पेलिंग मात्र जर पासवर्ड असेल, तर त्याला सहजासहजी गेस करता येत नाही. साधारण हॅकर कुणाचाही पासवर्ड शोधताना योग्य व्याकरण आणि स्पेलिंगचाच जास्त सर्च करतात. त्यासाठी डिक्शनरी पुरेशी असते. मात्र, चुकीचे स्पेलिंग शोधणे अशक्य आहे.

ई-मेल, बँक अकॉउंट वा विविध ठिकाणी वेगवेगळे पासवर्ड असावेत. ई-मेल पासवर्ड म्हणून कधीच वापरू नये. युजर नेम आणि पासवर्ड हे कॉबिनेशन एकच नको. विशेषतः एन्टरटेनमेंट साईट, सोशल साईट, आर्थिक व्यवहाराबाबत तर विशेष काळजी घ्यायला हवी. त्यात चुकीचे स्पेलिंग, चुकीच्या व्याकरणाचे पासवर्ड तुलनेने अधिक सुरक्षित ठरतात. अर्थात त्यासाठी तुम्हालाही काळजी घ्यावी लागेल, ती म्हणजे चुकीचे स्पेलिंग लक्षात ठेवण्याची..!

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement