SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यात लागणार 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन? लवकरच निर्णय होणार!

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केली आहे. राज्यातील सर्वच भागांत कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याने आरोग्यसुविधा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, याबाबतचा निर्णय येत्या 2 दिवसांत घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

तज्ज्ञांच्या मते, 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. तज्ज्ञांच्या मताला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिलाय. राज्यातील स्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. राज्यातील स्थिती पाहता जनतेला थोडी कळ सोसावी लागेल. तसंच सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलीय.

Advertisement

करोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना, पण कठोर निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्यास प्राधान्य द्यावे लागेल.असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, मुख्यमंत्री किमान 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहेत. 8 दिवसानंतर एक एक गोष्ट हळू हळू सुरु करु, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.

लॉकडाऊन 15 दिवसांचा?

Advertisement

कडक लॉकडाऊन 8 दिवसांचा असेल आणि नंतर गरजेनुसार तो एक आठवडा वाढविला जावा किंवा सुरुवातीलाच 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करावा, असे दोन पर्याय आहेत. 

मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले..

Advertisement

आता सध्या टाळेबंदीसारख्या कडक निर्बंधांची गरज आहे, जर असं केलं नाही तर 15 एप्रिलनंतर परिस्थिती कठीण होईल, याकडे कुंटे यांनी सर्वाचे लक्ष वेधले.

काँग्रेस नेत्यांची भूमिका काय?

Advertisement

राज्यातील आजच्या स्थितीत लोकांचा जीव वाचवण्याला प्राथमिकता दिली पाहिजे, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. हातावर पोट असणाऱ्यांचा विचार करावा लागेल. मृत्यू थांबवण्यासाठी सर्वोत्तम उपाय करा. वेळप्रसंगी कटू निर्णय घ्यावे लागले तरी तो स्वीकारायला हवा, असंही पटोले यांनी म्हटलंय.

कामगारांना मदत द्या

Advertisement

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना महत्वाचं मत मांडलं आहे. राज्यातील आमदारांचा विकासनिधी 2 कोटी रुपयांनी कमी करा आणि कामगारांना 5 हजार रुपये द्या, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मत-

Advertisement

अचानक लॉकडाऊन जाहीर करण्याऐवजी लोकांना विश्वासात घ्या, लॉकडाऊनचा रोड मॅप लोकांसमोर मांडा अन् मगच निर्णय घ्या, असा आग्रह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत धरला. मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यास सहमती दर्शविली.

आज कृती दलाची बैठक

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी आज, रविवारी कोरोना कृती दलाच्या तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. त्यात टाळेबंदी लागू करायची का,यावर आणि यासबंधीत सर्व विषयांवर चर्चा करण्यात येईल. तसेच टाळेबंदीबाबत 2 दिवसांत कृती आराखडा तयार करण्यात येईल.

Advertisement