SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा नवीन कुटुंब सदस्याचे नाव, या कागदपत्रांची असेल आवश्यकता, वाचा काय आहे प्रक्रिया..

रेशन कार्ड हे फक्त स्वस्त किंमतीत धान्य मिळते म्हणून नाही तर त्याचे बाकी अनेक फायदे आहेत. जर तुमच्या कुटुंबात एखादा नवीन सदस्य वाढला, जसे की कुटुंबात एखादे अपत्य किंवा एखादी नवीन सून वगैरे यांचं नाव रेशन कार्डमध्ये जोडू शकता. याशिवाय आपले नाव, पत्ता यासह काही अन्य माहिती चुकीच्या पद्धतीने लिहिली गेली किंवा काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारता येतील.

कोणती कागदपत्रे आवश्यक?

Advertisement

जर तुम्ही तुमच्या घरातील रेशन कार्डावर घरातील लहान मुलाचे नाव जोडायचं असेल, तर त्या कुटुंब प्रमुखाचे ओरिजिनल रेशन कार्ड आणि त्याची एक झेरॉक्स असणं आवश्यक, लहान मुलाचा/मुलीचा जन्मदाखला आणि आई-वडिलांचे आधार कार्ड

जर घरामध्ये लग्न करून आलेल्या नवीन महिलेचं नाव रेशन कार्डावर जोडायचे असेल, तर तिचे आधार कार्ड आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लग्नाचे प्रमाणपत्र, नवऱ्याच्या ओरिजिनल रेशन कार्डासोबत झेरॉक्स कॉपी आणि माहेरच्या रेशन कार्डावरून हटवल्याचे (नाव कमी करून घेतल्यानंतर मिळणारे) प्रमाणपत्र

Advertisement

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांचं नाव जोडण्यासाठी-

▪️ घरबसल्या रेशन कार्डमध्ये माहिती बदलण्यासाठी अथवा अद्ययावत करण्यासाठी राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Advertisement

▪️ पहिल्यांदा वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करा, यानंतर वेबसाईटच्या होमपेजवर आपल्या नव्या सदस्याचे नाव टाकण्याचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

▪️ मग एक फॉर्म ओपन होईल. ओपन झालेल्या या फॉर्ममध्ये कुटुंबातील ज्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची आहे त्याचा संपूर्ण तपशील भरा. 

Advertisement

▪️ त्या फॉर्मसह आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा. यानंतर फॉर्म सबमिट करा. 

▪️ आता फॉर्म सबमिट झाल्यावर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, या नंबरच्या मदतीने तुम्ही फॉर्म ट्रॅक करू शकता.

Advertisement

▪️ हा फॉर्म आणि त्यासोबत जोडण्यात आलेली सगळी कागदपत्रांवरील माहीती अधिकाऱ्यांकडून तपासण्यात येईल आणि ही माहिती योग्य असल्यास तुमची रिक्वेस्ट स्विकारली जाईल.

▪️ यानंतर तुम्हाला तुमचं नवीन रेशन कार्ड पोस्टाद्वारे तुमच्या घरच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement