SpreadIt News | Digital Newspaper

राहुल द्रविडच्या शिष्यासाठी दिला ‘या’ दिग्गजांना डच्चू

0

मुंबई – आयपीएलच्या 14व्या मोसमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी यांच्यात झाला. त्यात बंगळुरू संघाने बाजी मारली. तर दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला.

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या 14व्या मोसमाची विजयी सुरुवात केली. दिल्ली संघाने चेन्नईवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

Advertisement

दरम्यान, या सामन्यात दिल्लीचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर जखमी झाल्याने ऋषभ पंत यांच्याकडे कप्तान पदाची धुरा सोपवली आहे. रिषभने टॉस जिंकून चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, या सामन्यात ऋषभ पंतने संघनिवड करताना कौशल्य दाखवलं. त्याने चक्क दिग्गज खेळाडूंनाच खाली बसवताना नव्या दमाच्या खेळाडूंवर विश्वास दाखवला.

पंतकडे धोनीचा क्रिकेटमधला वारसदार म्हणून पाहिलं जाते. त्यात त्याचा कर्णधार धोनीशी मुकाबला होता. त्यामुळे या गुरु-शिष्याच्या जोडीकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले होते. कर्णधाराच्या भूमिकेत पंतचा दृष्टिकोन कसा असणार, याची पहिली झलक केवळ त्याने निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनवरुन पाहायला मिळाली. पंतने प्लेईंग इलेव्हन निवडताना अनेक धक्कादायक निर्णय घेतले.

Advertisement

दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविड याच्या एका शिष्यासाठी तर त्याने चक्क भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या दोन खास वेगवान गोलंदाजांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं नाही.

ऋषभ पंतने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली, तेव्हा त्यात वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि इशांत शर्मा यांची नावे नव्हती. पंतने ख्रिस वोक्स, आवेश खान, टॉम करन, अमित मिश्रा, रवीचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून मार्कर्स स्टॉयनिस यांची निवड केली.

Advertisement

विशेष म्हणजे, जलदगती गोलंदाज इशांत शर्मा व उमेश यादव यांच्याऐवजी राहुल द्रविडचा शिष्य व मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज आवेश खान याला प्राधान्य दिलं. पंतचा हा निर्णय सुरुवातीला अनेकांना धक्कादायक वाटला. परंतु आवेश खान याने अशी काही गोलंदाजी केली की सगळ्यांचीच बोटे तोंडात गेली. त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.

19 वर्षाखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक असताना, राहुल द्रविड याने आवेश खान याला संघात निवडले होते. स्वतः आवेश म्हणाला, की मला राहुल सर यांच्यासारखे प्रशिक्षक मिळाले, हे माझं भाग्य आहे. त्यांच्यासोबतची भेट खूप खास होती. इथून पुढच्या काळात खूप परिश्रम घ्यावे लागतील, ही बाब राहुल सरांनी खूप सहजतेने सांगितली होती.

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आवेश खान याने आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. यात त्याने 6 फलंदाजांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. दरम्यान, त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी 29 धावांत दोन बळी घेण्याची होती. आवेश खान याचा इकॉनॉमी रेट थोडा महाग होता. त्याने 9.68 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या होत्या. 2018च्या हंगामात त्याला 6 सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या 6 सामन्यांमध्ये त्याने 4 बळी घेतले होते.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement