SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारीच! लॉकडाऊनमध्ये खरेदी करा 7 हजारांपेक्षाही कमी किंमतीत ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन्स..

Tecno Spark 7

Tecno Spark 7 फोनमध्ये कंपनीने तब्बल 6,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. कंपनीने दोन स्टोरेज पर्यायांमध्ये हा मोबाईल आणला आहे. यामध्ये Tecno Spark 7 मध्ये 6.53 इंचाचा वॉटरड्रॉप नॉच एचडी प्लस डिस्प्ले, 16MP क्षमतेचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, 8MP क्षमतेचा फ्रंट कॅमेरा, अँड्राइड 11 वर कार्यरत (2GB रॅमसाठी अँड्राइड 11 Go) असून Helio A25 quad-core प्रोसेसरचा सपोर्ट आहे. 2GB रॅम + 32GB स्टोरेज मॉडेलची किंमत 6,999 रुपये आहे. तर, 3GB रॅम + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 16 एप्रिल 2021 रोजी फोनचा Amazonवर पहिला सेल आहे.

Advertisement

Tecno Spark Go 2020

टेक्नो स्पार्क गो 2020 मध्ये 2 जीबी रॅम प्लस 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज, स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. एचडी प्लस डिस्प्ले, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा व ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप, हँडसेट मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत 6 हजार 999 रुपये आहे.

Advertisement

Infinix Smart HD 2021

इनफिनिक्स स्मार्ट एचडी 2021 मध्ये 2 जीबी रॅम, 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज व स्टोरेजला 256 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये 6.1 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा रियर व 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनची किंमत 6 हजार 499 रुपये आहे.

Advertisement

Realme C11

रियलमी सी 11 स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅम प्लस 32 जीबी स्टोरेज, 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, 13 व 2 मेगापिक्सलचा ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप , 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा , फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत 6 हजार 999 रुपये आहे.

Advertisement

Redmi 8A Dual

रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅम प्लस 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज, 6.22 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा व 2 मेगापिक्सलचे 2 रियर कॅमेरे व 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा व 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनची किंमत 6 हजार 999 रुपये आहे.

Advertisement

Gionee Max Pro

जिओनी मॅक्स प्रो मध्ये 3 जीबी रॅम प्लस 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज, स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, ऑक्टा कोअर प्रोसेसर, 13 मेगापिक्लचा प्रायमरी व 2 मेगापिक्सलचा सेकंडरी रियर सेन्सर, 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh ची बॅटरी दिली आहे. याची किंमत जवळपास 6,4900 रुपये आहे.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement