SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

😱 जम्मू-काश्मीरमध्ये एन्काऊंटर

▪️ शोपियामध्ये सुरक्षा दलांकडून तीन दहशवाद्यांचा खात्मा; पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत 11 दहशतवादी ठार, पोलिस आणि सुरक्षा दलांना येथे दहशतवादी लपून बसल्याची प्राथमिक माहिती

Advertisement

😷 देशात 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना दिली लस?

▪️ भारतात सर्वात कमी 85 दिवसात 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना दिली लस, अमेरिका आणि चीनलाही टाकले मागे
शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत संपूर्ण देशात देण्यात आले एकूण 10.12 कोटी डोस

Advertisement

▪️ धडकी भरवणारी आकडेवारी! देशात 24 तासांत आढळले 1,52,879 पॉझिटिव्ह रुग्ण, मृतांची संख्याही 800 पार, सध्या सक्रिय कोरोनाबाधित -11,08,087

😳 महेंद्रसिंग धोनीला झाला 12 लाखांचा दंड

Advertisement

▪️ बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार,धोनीला दिल्ली विरूद्ध स्लो ओव्हर रेटसाठी ठोठावण्यात आला हा दंड, महेंद्रसिंग धोनीला सामना संपल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने ठोठावला दंड

▪️ बीसीसीआयचा नवा नियम – गोलंदाजी करणाऱ्या संघांला 85 मिनिटांत एकूण 20 ओव्हर आणि एका तासामध्ये 14.1 ओव्हर टाकणे बंधनकारक

Advertisement

महाराष्ट्राचे राजकारण विरोधी पक्षाच्या हातात गेले आहे काय?

▪️ संजय राऊत म्हणाले की, ‘अनिल देशमुख प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ‘सीबीआय’साठी दरवाजे उघडले. देशमुखांसारखी फुसक्या आरोपांची प्रकरणे देशात अनेक राज्यांत घडतात, पण तेथे सीबीआय पोहोचत नाही.

Advertisement

▪️ आसामामधील एका मतदान केंद्रावर 90 मतदारांची नोंद असताना तेथे 171 मतदान झाले व त्यास कुणी आक्षेप घेतला नाही! हे कसे रोखणार?’ राऊतांनी केला सवाल

💁🏻‍♂️ महाराष्ट्राला केंद्राकडून मिळणार 1,121 व्हेंटिलेटर्स?

Advertisement

▪️ केंद्राडून महाराष्ट्रासाठी येत्या 3-4 दिवसांत 1,121 व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार, यांपैकी 165 व्हेंटिलेटर्स पुणे जिल्ह्यासाठी असतील

▪️ राज्याला शुक्रवारी सायंकाळपर्यंत 1 कोटी 10 लाख डोस उपलब्ध झाले. तसेच राज्यात सध्या 15 लाख 63 हजार लसींचे डोस शिल्लक, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहीती; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहीती

Advertisement

🌟 मार्केट अपडेट: आजचा सोने-चांदीचा दर

▪️ मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार, 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,446वर, तर 1 किलो चांदीची किंमत बाजार बंद होताना 66,930 रुपयांवर

Advertisement

▪️ गुड रिटर्न्सच्या संकेतस्थळानुसार मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि पटणा या शहरांमध्ये सोन्याची किंमत काहीशी कमी

💰 अलीबाबा समूहाला 2.8अब्ज डॉलर दंड

Advertisement

▪️ स्पर्धात्मकता नियमांचा भंग केल्याप्रकरणी चीनमधील अलिबाबा समूहाला चीनच्या नियामक संस्थेने 18.3 अब्ज युआन म्हणजे 2.8 अब्ज डॉलर्सचा दंड

तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement