कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्राला जास्त धोकादायक सिद्ध होत आहे. गेल्या वर्षभरापासून शिक्षणक्षेत्राला देखील याचा मोठा फटका बसला आहे. लहान वर्गाचे कसेही निभावून गेले. प्रश्न उरतो तो बोर्डाच्या परीक्षांचा ज्यावर विद्यार्थ्यांचे पूर्ण व्यावसायिक आणि वैयक्तिक भवितव्य अवलंबून असते.
तरीदेखील, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हे महत्त्वाचे वळण असताना, कोरोना सारखा विषाणू राज्यभरात थैमान घालत आहे. अशा परिस्थितीमध्ये दहावी-बारावीचे वर्ग ऑनलाईन भरवून कसेबसे वर्ष ढकलण्यात आले. मात्र, परीक्षांच्या बाबतीत कोणता निर्णय होणार? याबाबत अजूनही सरकारची स्पष्टता सिद्ध होत नाही.
पुढच्या आठवड्यामध्ये याबाबत निर्णय होणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन व्हावी अशी पालकांची आणि विद्यार्थ्यांची आरोग्याच्या दृष्टीने मागणी असली तरीदेखील ऑनलाइन परीक्षा राज्यभरात घेणे ही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने तेवढी सोपी गोष्ट नाही.
अशी यंत्रणा उभी करायला नेमका किती वेळ लागेल? आणि या वेळेत दहावी-बारावीची परीक्षा होऊ शकते का? असे अनेक प्रकारचे मुद्दे घेऊन राज्य शासनाने टाटा एजन्सी आणि गुगलकडे विचारणा केली होती. दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या उत्तरानुसार, दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन घ्यावी लागणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.
काय आहे म्हणणे गुगलचे?
महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये ऑनलाईन परीक्षा घेणे आणि तात्काळ यंत्रणा उभी करणे हे केवळ अशक्य आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशी यंत्रणा उभी करण्याची कंपनीची ताकद लक्षात घेता, येते दोन वर्ष तरी कंपनीला तांत्रिकदृष्ट्या यंत्रणा उभी करण्यात जातील.
काय आहे आता पुढे प्रश्न?
अनेक विरोधी पक्षनेते विद्यार्थ्यांचे हित त्यांची परीक्षा घेण्यात आहे, असे म्हणत असले तरीदेखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवा मुद्दा उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य जपत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांना प्रमोट केले तसे प्रमोट करावे अशी मागणी केली आहे.
मात्र, दहावी आणि बारावी हा करिअरचा टर्निंग पॉइंट असल्याकारणाने असे करणे अशक्य आहे. ऑनलाईन परीक्षा घेणे देखील तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. कोरोना काळामध्ये अनेक शिक्षकांना देखील कोरोनाची लागण झाली असून अनेकांनी आपला जीव देखील गमावला आहे.
अशा परिस्थिती मध्ये ऑफलाइन परीक्षा घेणे म्हणजे प्रश्नपत्रिका वाटणे, उत्तर पत्रिका गोळा करणे, तपासणे, गठ्ठे बांधणे, विद्यार्थ्यांची हजेरी घेणे, कॉपी आहे की नाही यासाठी त्यांची चेकिंग करणे, या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा परस्पर संपर्क येणार. यातून कोरोना ची लागण आणि प्रादुर्भाव वाढण्यास मदत होईल ही शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट असल्याने दवाखाने सुद्धा पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमीडिसविर यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. ऑफलाइन परीक्षेशिवाय जर मार्ग नसेल तर परीक्षा पुढे ढकलणे एवढा एकच उपाय सरकारपुढे शिल्लक राहतो. पुढील आठवड्यामध्ये याबाबत आता कोणता निर्णय होतो, याकडे लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींचे लक्ष लागले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 इतर महत्वाच्या बातम्या :
1️⃣ आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/hc12B8X