SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ कारणाने खुद्द खासदार उदयन राजेंनी हाती घेतला कटोरा!

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शनिवार रविवारी लॉकडाऊन असणार आहे. यातच व्यापारी वर्ग सुद्धा आमच्या पोटावर पाय देत आहात म्हणून सरकारच्या विरोधात जागोजागी आंदोलन करत आहे.

साताऱ्यात पोवई नाका येथे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी याच लॉकडाऊन विरोधात ‘भिक मांगो आंदोलन’ केले आहे. सर्व व्यापारी वर्गाची हीच अवस्था झाली आहे असे ते म्हणाले.

Advertisement

पोवई नाका येथे स्वतः उदयनराजे कटोरा घेऊन बसले होते. राज्य सरकारने लॉकडाऊन चा निर्णय कोणत्या तज्ज्ञांच्या हवाल्याने घेतला आहे हे सांगावे मग आम्ही लॉकडाऊन पाळू असे ते बोलले.

जर सरकारने हा लॉकडाऊन लावला तर लोक आता पोलिसांना चोपून काढतील. काही हाणामारी झाली तर त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Advertisement

सरकारमध्ये जे लोक बसले आहेत, त्यातले कोणीच तज्ञ वाटत नाहीत. मग निर्णय कोण घेत आहे? वैद्यकीय अधिकारी, शास्त्रज्ञ यांनी लॉकडाऊन हा पर्याय सुचवला असेल तर अहवाल दाखवा मान्य करू असेही ते बोलले.

लसीकरणावर बोलताना त्यांनी देशाची लोकसंख्या पाहुन सर्वांना लस वाटप होत असते. उगाच राजकारण करू नका. फॅमिली प्लॅनिंग प्रत्येकाने नीट केलं असतं तर लसीचा तुटवडा भासला नसता असेही ते बोलले.

Advertisement

मृत्यू वाढत आहेत मात्र माणसाला मरणापासून कोणी अडवू शकत नाही. लॉकडाऊन हा नाही तर योग्य ती काळजी घेऊन सर्वांना जगू देणे, काम करू देणे हा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी सर्वांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देखील दिल्या.

Advertisement