SpreadIt News | Digital Newspaper

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या काही सोप्या टीप्स; या अवलंबा आणि निरोगी रहा!

0

फळे, पालेभाज्या खाणे हे आरोग्यासाठी हितकारक असते हे आपण जाणतोच. फळांनी आणि पालेभाज्यांनी शरीराला आवश्यक असणारे घटक मिळतात. आज आपण अशी काही फळे माहीत करून घेणार आहोत, जी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत:

लिंबू : लिंबामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. यामुळे, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागते. लिंबाच्या सेवनामुळे रक्त शुद्धीकरण होते. शरीरात निर्माण होणाऱ्या विविध अनिष्ट घटकांपासून मुक्तता मिळू शकते.

Advertisement

आवळा : हा आपल्या आरोग्यास अतिशय हितकारक आहे. यात समाविष्ट असणारे व्हिटॅमिन बी5, बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे आपल्या शरीराला समृद्ध करतात आणि आवळा अँटी ऑक्सिडंट्स सुद्धा आपल्याला पुरवतो. त्यामुळे, रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

हिरव्या भाज्या : या देखील खाल्ल्याने शरीराला लोह, अँटी ऑक्सिडेंटस मोठ्या प्रमाणात मिळतात. कच्च्या भाज्या या शिजवलेल्या भाज्यांहून अधिक प्रभावशाली असतात. त्यात पोषणतत्वे जशीच्या तशीच असल्याने शरीराला अधिक फायदा होतो आणि आजारपणात आपली ताकद तशीच राहते.

Advertisement

संत्री : हे मानवी पेशी आणि पोटॅशियम ने समृद्ध आहे. यात असणारे द्रव आपल्याला शरीरासाठी आवश्यक असे घटक पुरवतात. पोटॅशियम आणि सोडियम क्रियांच्या सहाय्याने हृदयाचे ठोके रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.

दररोजच्या आहारात पालेभाज्या आणि एक तरी फळ असल्यास कोणताही संसर्गजन्य आजार आपणास झाला तरी त्यातून बरे होण्याची शक्ती आपल्यात टिकून राहते. आज काल कोरोनाचे जे थैमान सुरू आहे, अशा काळात तर सर्वांनी आपल्या आहाराची काळजी घेणे सर्वात उत्तम!
➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement