SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रोहित शर्माचा जबरा फॅन; आयपीएल मध्ये रोहित खेळायला येताच केले असे काही की सगळेच म्हणतायत फॅन असावा तर असा!

भारतामध्ये क्रिकेट हा खेळ अक्षरश: एखाद्या धर्माप्रमाणे फॉलो केला जातो. क्रिकेट साठी अनेक भारतीय काहीही करू शकतात. अनेकदा आपण अशा लोकांचे किस्से ऐकतो ज्यांची काहीतरी धारणा असते आणि त्यानुसार ते क्रिकेट सुरू झाला की, वागतात.

क्रिकेटच्या मॅच सुरू असताना अमुक प्रकारे बसल्याने, किंवा एखादा शब्द न उच्चारल्याने, उपाशीपोटी क्रिकेट पाहिल्याने, आपला आवडता संघ मॅच जिंकतो, अशा अनेक प्रकारच्या धारणा घेऊन लोक क्रिकेट बघतात.

Advertisement

आयपीएलचा 14 वा हंगाम शुक्रवारी सुरू झाला. पहिली मॅच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यामध्ये होती. मुंबई इंडियन्स म्हटल्यावर आपल्याला रोहित शर्मा आठवणार नाही, असे होत नाही. हिटमॅन रोहित हा कायमच आपल्या चाहत्यांना आपल्या फटकेबाजीने खुश करून टाकतो.

सलग पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या संघाचा एकमेव कर्णधार म्हणून देखील तो नावाजला गेला आहे. जगभरात त्याचे असंख्य चाहते आहेत.

Advertisement

त्याची एक झलक मिळावी म्हणून अनेकदा काहीही करायला लोक तयार असतात. मात्र कोरोनाचे थैमान वाढत असल्याने आयपीएल मध्ये देखील प्रेक्षकांची उपस्थिती नव्हती.

Advertisement

त्याच्या एका चहात्याला आयपीएल बघायला मैदानात जाता आले नाही. म्हणून त्यांनी घरीच आपल्या टीव्ही स्क्रीन समोर असे काही केले की, त्याचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला आहे. रोहित खेळायला उतरला की, या पठ्ठ्याने त्याच्या घरातूनच त्याची आरती करायला सुरुवात केली.

हा व्हिडिओ Dr. TNR Psycho या ट्विटर अकाउंट वरून व्हायरल झाला आणि बघता बघता जगभरातील लोकांनी तो पाहिला देखील! जगभरातील प्रत्येक क्रिकेटप्रेमींना रोहित वरचे भारतीयांचे प्रेम यातून नक्कीच दिसले असेल यात शंका नाही.

Advertisement