SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर विसरला आहात? जाणून घ्या तो शोधायची प्रक्रिया!

आधार कार्ड हा प्रत्येक व्यक्तीचा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या कार्डशी संबंधित प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. आधार नंबर माहित असला म्हणजे गोष्ट संपते असं होत नाही. तर तुम्हाला त्याविषयीची प्रत्येक घडामोड जाणून घेण्यासाठी आधार कार्ड ची लिंक असलेला मोबाइल नंबर देखील लक्षात असणे गरजेचे आहे. याद्वारे अनेक सरकारी कामांमध्ये तुम्हाला मदत होऊ शकते.

मात्र, जर तुम्ही आधार कार्ड खूप आधी काढलेले असेल आणि त्यावर टाकलेला मोबाईल नंबर तुम्ही विसरला असाल तर, तो शोधण्याची प्रक्रिया आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत!

Advertisement

– आधी तुम्हाला यूआयडीएआयच्या (UIDAI ) https://uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ती वेबसाईट नीट पहावी लागेल.

– या वेबसाइटच्या डॅशबोर्डवर असलेल्या My Aadhar या कॅटेगरीत जा.

Advertisement

– त्यानंतर Aadhar Services या पर्यायावर क्लिक करा.

– व्हेरीफाय ईमेल / मोबाइल नंबर असा ऑप्शन दिसेल

Advertisement

– या विंडोमध्ये आपला आधार नंबर आणि मोबाइल नंबर टाका.

– यानंतर कॅप्चा टाका आणि ओटीपी जनरेट करून घ्या. एक मेसेज लगेच येईल.

Advertisement

– तुमचा मोबाइल नंबर आधीपासून आधारशी लिंक असेल तर The Mobile you have entered already verified with our records असा मेसेज दिसेल. याचा अर्थ असा की, तुमचा मोबाइल नंबर आधीपासूनच आधारशी लिंक आहे.

– मोबाइल नंबर आधीपासून लिंक नसेल तर The Mobile number you had entered does not match with our records असा मेसेज येईल. त्यावरून तुमचा दुसरा कोणता तरी मोबाइल नंबर आधारशी जोडला आहे, हे लक्षात येईल. मोबाईल नंबरप्रमाणे, नोंदणीकृत ईमेल आयडी सुद्धा असाच जाणून घेता येऊ शकतो.

Advertisement

एकदा ही गोष्ट लक्षात आली की, रजिस्टर असलेला मोबाईल नंबर देखील कळेल, आणि नंबर रजिस्टर नसेल तर तो अपडेट करून घेणे सोपे होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement