SpreadIt News | Digital Newspaper

📌 दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींचा थेट आढावा

0

◼️राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही; मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका तर केंद्राकडे सतत बोट दाखवणार असाल तर आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेऊ नका, फडणवीस यांची भूमिका ठाम!

◼️गडकरींचे प्रयत्न आले फळाला; कोरोनाने बेहाल झालेल्या नागपूरला मिळणार 10 हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स!

Advertisement

◼️ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना घरोघरी जाऊन लस टोचली जात नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतात. मग शरद पवार यांना थेट घरी जाऊन लस टोचण्याचे कारण काय? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने टोचले राज्य सरकारचे कान

◼️मोदी सारकरमुळेच देशाची लोकशाही बिकट अवस्थेत असल्याचा भाजपचेच राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा; लोकशाही, अर्थव्यवस्था आणि सीमेबाबत गंभीर तडजोडी केल्याचा ठपका ठेवत केला मोदी सरकारला घरचा आहेर!

Advertisement

◼️ आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई आणि दिल्ली आमने सामने; दिल्लीने नाणेफेक जिंकत घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, चेन्नई 141 / 6 अशी सध्याची धावसंख्या असून खेळ सध्या जोमात सुरू!

◼️राज्यात लॉकडाऊन आनंदाने लावलेला नाहीये, खासदार उदयनराजेंनी रुग्णवाढीचा अभ्यास करावा; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा उदयनराजेंना सल्ला

Advertisement

◼️आमदारांचा निधी 2 कोटींनी कमी करावा; चंद्रकांत पाटलांची लॉकडाऊन संबंधित व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

◼️कंबरेकडील स्नायू दुखावल्याने राज ठाकरेंवर होणार छोटी शस्त्रक्रिया; लिलावती रुग्णालयात दाखल असल्याने मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपस्थित राहण्यास असमर्थ

Advertisement

◼️सूर्यवंशी, 83 या चित्रपटानंतर आता कंगनाच्या थलायवी चे प्रदर्शन लांबणीवर; कोरोनाच्या प्रादुर्भावाने थेटर्स बंद असल्याने प्रदर्शनाची तारीख मिळणे देखील कठीण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Advertisement